देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री जाहिरातीवर बंदी; औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

Latest News

देवी देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र, खडे मणी, यांची विक्री करण्याची तसेच प्रसार माध्यमांवर त्यांची जाहिरात दाखवण्यास औरंगाबाद खंडपीठाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारच्या यंत्रांची विक्री उत्पादन प्रचार व प्रसार करणाऱ्या अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यानुसार यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे.

प्रसारमाध्यमात देवी-देवतांची नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यात येतात, अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन विक्री आणि प्रचार-प्रसार करण्याविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा तसेच, या प्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचललेली आहेत? याची माहिती तीन दिवसात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे.

सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते. राज्यशासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार या गोष्टींचे प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाऊनसेंटर, सिडको, औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी संबंधित २०१३ चा कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे. कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. संबंधित याचिकाकर्ते अंभोरे यांनी याचिका नंतर मागे घेण्याची विनंती खंडपीठास केली होती. खंडपीठाने याचिका समाजासाठी महत्वाची असल्याने पुढे चालू ठेवली.

न्यायालयाचे मित्र म्हणून बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. राज्य शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी तर केंद्राच्यान वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले. यंत्र बनविणाऱ्या प्रतिवादी कंपनीतर्फे सचिन सारडा हजर झाले होते.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.5 / 5. Vote count: 4

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply