दिनांक : २१/०७/२०२१ रोजी दादर पश्चिम रेल्वे स्टेशन वरील विरार लोकल गाडीचे सेकंड क्लास जनरल डब्यात गर्दीतून चढून गेल्यावर फिर्यादी याचे मागच्या पॅन्टच्या खिशातील १२,९९९/- रुपये किमतीचा मोबाईल फोने चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी याने मुंबई सेट्रल रेल्वे पोलीस स्टेशन ला दिली त्यानुसार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा , विशेष कृती दलाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.हेमराज साठे व स्टाफ असे करत असतानां . दि,२६/०७/२०२१ रोजी दोन संशयित इसम दादर रेल्वे स्टेशन फलाट क्र . ३ वर प्रवाशाच्या गर्दीत संशयास्पद स्थितीत वावरत असताना मिळून आले , त्यांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा विशेष कृती दल, भायखळा लोहमार्ग मुंबई कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली असता आरोपी नाव : जुगुनु मशीउल्ल्ला खान वय : २७ २ ) ताहीर महंमद फारूक अल्ली वय : ३० रा. कुर्ला , यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांना अटक करण्यात आली .
आरोपी क्र १ याची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्याने रेल्वे गाडीतून प्रवासांचे एकूण ८४,९९९/- रुपये किमतीचे एकूण ८ मोबाईल चोरल्याचे कबूल केले. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दादर रेल्वे पोलीस ठाणे ,ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. कैसर खलिद , पोलीस आयुक्त , लोहमार्ग मुंबई श्री. एम. एम. मकानदार , पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ यांचे आदेशप्रमाणे गुन्हेशाखा , लोहमार्ग मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक , हेमराज साठे यांच्या अधिपत्याखाली सहा. पो. उपनिरी . महेश कदम , मपोहवा मयेकर , पोहवा वार्ग , पोहवा . देशमुख , पोना पाटील ,पोना थोरात , पोना फडके , पोना दिघे , पोशि निकम , पोशि चव्हाण यांनी केली आहे.
