मिरा-भाईंदर – डिजीटल अरेस्ट करुन लुबाडणाऱ्या दोघांना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षा कडुन अटक करण्यात यश. अधिक माहितीनुसार लखनऊ, उत्तरप्रदेश येथील फिर्यादी बी. एन. सिंह, वय ७४ वर्षे यांना डिजीटल अरेस्ट करुन त्यांच्या वृधपकाळाचा फायदा घेवून त्यांच्या कडुन तब्बल ९५,००,०००/- (९५ लाख रुपये खंडणी उकळून त्यांची फसवणुक केली याबाबत लखनऊ, उत्तरप्रदेश सायबर क्राईम पोलीस स्टेशन नोंद लखनऊ, उत्तरप्रदेश येथे राहणारे सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील आरोपी १) मोहम्मद इकबाल बालासाहेब पुत्र इकबाल चिन्नु बालासाहेब, २) शाईन इकबाल बालासाहेब पुत्र इकबाल चिन्नु बालासाहेब, या दोघा भावांनी सदर गुन्हयातील वयोवृध्द फिर्यादी यांची फसवणुक केली याप्रकरणी तपासकामी सदर गुन्हयाचे तपासिक अंमलदार श्री. सुनील कुमार सिंह, पोलीस निरीक्षक, सायबर पोस्टे, लखनऊ, उत्तर प्रदेश हे त्यांचे पथकसह मिरारोड येथे येवून त्यांनी श्री. संदिप डोईफोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांना पोलीस मदत मिळावी अशी विनंती केली असता मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) यांनी श्री. अविराज कुराडे, मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष यांना योग्यती मदत करण्याबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद दोन्ही आरोपी १) मोहम्मद इकबाल बालासाहेब पुञ इकबाल चिन्नु बालासाहेब, २) शाईन इकबाल बालासाहेब पुत्र इकबाल चिन्नु बालासाहेब, यांना मिरारोड येथून दिनांक २४/०७/२०२५ रोजी ताब्यात घेवुन सायबर पोलीस लखनऊ, उत्तर प्रदेश यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सायबर पोलीस लखनऊ, उत्तर प्रदेश हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. निकेत कौशीक, अपर पोलीस आयुक्त, श्री. इदत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. संदिप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि. प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, पोउपनिरी. श्रीमंत जेधे, सपोउनि. मनोहर तावरे, असिफ मुला, संतोष मदने, पोहवा. प्रविण पवार, समीर यादव, रविंद्र कांबळे, हनुमंत सुर्यवंशी, विकास राजपुत, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संदिप शेरमाळे, धनंजय चौधरी, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, पोअंम. अंगद मुळे, नितीन राठोड, मसुब सचीन चौधरी सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष, सफौ. संतोष चव्हाण नेमणुक सायबर पो.स्टे. यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
