दिनांक: ०७/०८/२०२१ रोजी २. ३० वा . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस.एस.पाटील यांना भाईंदर रेल्वे स्टेशन बंदरवाडी नाका येथे एक महिला वेश्यादलाल नेहा हि पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवीत असे हि बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना पाठवून छापा टाकला असता नेहा रेहमान वय : ३१ रा. बांद्रा हि वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गिऱ्हाईकाकडून पैसे स्वीकारून मुली पुरवीत असताना आढळून आली असता आरोपी ला रक्कमेसह ताब्यात घेऊन ०३ मुलींची सुटका केली. सदर बाबत महिला वेश्यादलाल नेहा हिच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाणे येथे पो.हवा विजय विनायक ढेमरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी डॉ.श्री. महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर विभागाचे वपोनि श्री. संपतराव पाटील. पोहवा विजय ढेमरे, पोहवा. रामचंद्र पाटील, मपोना. यंबर , मपोना .कमल चव्हाण , पो. शि . केशव शिंदे, चालक पोना. गावडे यांनी केली आहे.
