वसई : दिनांक ९/७/२०२१ माणिकपुर पोलीस ठाण्याचे हद्दीत विश्वकर्मा पॅराडाईज फेस -०१को. ऑप . सोसा . लिमीटेड , ए विंग, फ्लॅट नं : १०९, अंबाडी रोड , वसई पश्चिम , पालघर , येथे बनावट कॉल सेंटर चालविले जात असुन त्या ठिकाणावरून भारतातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल धारकांना संपर्क साधुन त्यांना Googl Play Store मधुन(MT5)(FQ Markets) तसेच अशाच प्रकारचे ०४ ते ०५ अँप द्वारे शेअर मार्केट , फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तसेच वरील नमूद अँपमध्ये रक्कम भरणा करण्याद सांगून लाखो गुंतवणूक दारांची रक्कम परत न देता फसवणूक करीत असल्याची गुप्त बातमी सफौ / महेश गोसावी यांना मिळाली होती . मिळालेल्या बातमीची खातरजमा करून गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली . सदरच्या कारवाई दरम्यान संशयीत १) आदिल युसूफ मेमन वय : २८ कॉल सेंटर चालवणारा २) हुसेन नोमान बुंदीवाला वय :२२ ३) हुजेफा अकबर बहरेनवाला , वय : २३ ४) मुर्तुजा हुजेमा भांन्डपुरावाला वय : १९ ५) अब्देली शब्बीर इजी वय : २१ ६) हुसेन शब्बीर संजानवाला वय : २३ यांना ताब्यात घेण्यात आले . तसेच नमूद घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले १६ मोबाईल, ४८ सिमकार्ड असे जप्त करण्यात आले .
सदर गुन्हे शाखा, मिरा भाईंदर – वसई -विरार पोलीस आयुक्तालय यांचे कडून जनतेला आवाहन करण्यात आले कि , ज्यांची संबधीत गुन्ह्यात फसवणूक झालेली असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर गुन्हे शाखा, मिरा भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तलयाचे कार्यालयाशी तात्काळ सपंर्क साधावा . सदर आरोपी विरुद्ध माणिकपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे . व त्या पुढील तपास चालू आहे तसेच ह्या FQ Markets अँप द्वारे फसवणूक झाल्याबाबतचा गुन्हा यापूर्वी २) सोनारी पोलीस ठाणे , जमशेदपूर , झारखंड येथे नोंदविण्यात आला आहे याप्रमाणे सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदरची कारवाई डॉ . श्री. महेश पाटील, पोलीस उप. आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखा पो. नि सुजितकुमार गुंजकर , सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि संतोष भिसे , पोशि . प्रवीण आव्हाड , पोशि. गणेश इलग व खाजगी सायबर तज्ञ श्री. निशित केतन शाह यांचेसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, वसई विभागाचे पो. नि. संतोष चौधरी व पथक यांनी केली आहे.
