भाईंदर : खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून एका व्यक्तीकडून २ लाख रु. खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार प्रमोद रावल वय ५७ वर्षे, यांना मागील एक ते दिड महिन्यापासुन एक अनोळखी ज्योती नावाची महिला फोन करुन भेटण्यासाठी बोलावत होती.दि. २३.०३.२०२२ रोजी ज्योती नावाचे महिलेने रावल यांना शिर्डीनगर, भाईंदर पुर्व येथे भेटण्यासाठी बोलविले व नमुद महिलेने प्रमोद रावल यांना एका बिल्डींगमधील रुममध्ये नेले.व त्यांचे शर्ट काढुन त्यांच्याशी अंगलगट करीत असताना तेथे तीन अनोळखी इसम येऊन रावल यांना ते पोलीस असल्याचे सांगुन त्यांचेविरुध्द पोलीस केस दाखल करणार अशी धमकी दिली. त्यावेळी त्या तीन पोलीसांनी केस दाखल न करण्यासाठी प्रमोद रावल यांच्याकडे २ लाख रु. ची मागणी करुन ४५,०००/- रु. व ए.टी.एम. कार्डने २५,०००/- रु. घेऊन उर्वरीत रक्कम दोन दिवसांनी देण्यास सांगितले.
सदर माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रावल यांच्या कडे पैश्यांच्या आकाराचे कागदी बंडल तयार करुन एका खाकी लखोट्यात टाकुन देऊन खंडणीची पैसे वसूल करणाऱ्या व्यक्तींना वेस्टर्न हॉटेल, काशिमिरा येथे सापळा रचून बोलाविण्यात आले व पोलिसांनी त्या दोन इसमांना रंगेहात ताब्यात घेतले. तसेच त्या दोघा इसमांचा तिसरा साथीदार व तक्रारदार यांना फोन करणारी महिला यांना सुध्दा ताब्यात घेतले. सदर गुन्हयात खंडणी घेणारे आरोपी १) सुदर्शन बिबीशन खंदारे, वय ३२ वर्षे, रा. आदर्श इंदिरा नगर, भाईंदर पुर्व, २) विजय तुकाराम पाटील, वय ५६ वर्षे, रा. विरार पुर्व, जि. व ३) आयुब रेहमान खान, वय ४५ वर्षे, रा. श्रीराम ज्वेलर्सचे मागे, भाईंदर पुर्व, व एक महिला यांना नवघर पोलिसांनी यांना अटक करुन गुन्हयाची उकल केलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. अमीत काळे, सहा.पो.आयुक्त श्री. डॉ. शशीकांत भोसले, नवघर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद देसाई, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/योगेश काळे, पोउनि/संतोष धाडवे, पोहवा/ भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/संदिप जाधव, ओमकार यादव, सुरज धुनावत, विनोद जाधव यांनी केलेली आहे.
