आजीचा खून करून ७ वर्षांपासून फरार असलेल्या नातवास अखेर पोलिसांनी केले जेरबंद .

अंधेरी :  दिनांक १३/०६/२०१४ रोजी रूम नं. ०३, गणपत चाळ,अंधेरी पुर्व, ह्या घराचा दरवाजा बाहेरून कुलूप लावुन बंद सुन रूम च्या आत मधून दुर्गंधी येत असल्याची  तक्रार  दत्ताराम मारोती वाघमारे. यांनी पवई पोलीस ठाणे येथे केली होती पोलिसांनी घटनास्थळी जावून बघितले असता त्याठिकाणी वृध्द महिला  शशीकला मारोती वाघमारे, वय ७५ वर्षे, हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत […]

Continue Reading

भाडेकरु इसमांची माहिती देण्याबाबत पोलीस उपायुक्त यांनी दिले आदेश.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठया संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडेतत्वावर देतांना संबंधित घरमालक हे भाडेकरुंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाडयाने देतात व त्यांचेकडून ओळखीबाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे व समाज विरोधी […]

Continue Reading

प्रेयसीचा खून करून मृतदेह खाडीमध्ये फेकणाऱ्या प्रियकरास पोलिसांनी केली अटक.

विरार :   दिनांक २७/११/२०२१ रोजी म्हारंबळपाडा, विरार पश्चिम,येथील जेट्टीपासुन आत १०० मिटर अंतरावर समुद्राच्या पाण्यात अनोळखी मयत महिला वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असलेले प्रेत अर्धवट कुजलेले स्थितीत अर्नाळा पोलिसांना मिळुन आले होते. सदर मयत महिलेचा गळा आवळुन कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तीला ठार मारुन पुरावा नष्ट करण्याकरीता मयत महिलेच्या गळयात नॉयलॉन दोरी […]

Continue Reading

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ- १ मधील पोलीस स्टेशनला १४ चारचाकी व १७ दुचाकी वाहनांचे वाटप.

दिनांक ०२/१२/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे केलेल्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून १४ चारचाकी व १७ दुचाकी वाहने प्राप्त झाल्याने श्री. एकनाथ शिंदे, मा. मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांचे हस्ते पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ मधील पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेला सदर वाहनांचे दिनांक […]

Continue Reading

एक लाखाहुन अधिक किंमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक.

भाईंदर : दिनांक ०२.११.२०२१ रोजी सोहनलाल गणेशाराम सुतार, वय ४३ वर्षे यांचा इंद्रलोक नाका ते विमल डेअरी लेन येथे रिक्षात बसुन प्रवास करीत असतांना मोबाईल गहाळ झाला याबाबत त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  मात्र प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना सदर घटनेची माहिती समजून घेतली असता असे समजले कि , तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणेच इतरही लोकांचे त्याच […]

Continue Reading

नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी- बँकेमध्ये आलेल्या इसमांचे हातचालाखीने पैसे चोरणा-या आरोपीसं अटक

भाईंदर :  बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस दोन इसमांनी फसवुन त्यांचे पैसे चोरले . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४.११.२०२१ रोजी  रामभवन कल्पनाथ राजभर, वय २५ वर्षे हे युनीयन बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांना  पैश्यांचे आमीष दाखवुन त्यांचे रुमालामध्ये १ लाख रु. बांधलेले आहेत असे सांगुन पैश्यांचे आकाराचे कागद बांधलेला रुमाल रामभवन राजभर  […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिकेतून मिरा भाईंदर शहरात आलेल्या ९ प्रवाशांचा शोध घेण्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेला मिळाले यश.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिस-या लाटेचा धोका संपलेला नाही. दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर […]

Continue Reading

कट रचुन खुन करणाऱ्या कुविख्यात गॅगस्टरला पोलिसांनी केले जेरबंद.

घाटकोपर :   दिनांक  ०४/१०/२०२१ रोजी  खुन करून फरार झालेल्या १० आरोपीना गुन्हे प्रकटीकरण शाखा, युनिट-७, घाटकोपर यांनी अखेर केली अटक . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४/१०/२०२१ रोजी  टेंबीपाडा, भांडुप (प.)कोमल यादव चाळ ते अष्टविनायक डेअरीच्या गल्लीत रामनगर,येथे  रात्री ०२.२० ते ०२.३० वा. चे दरम्यान  तक्रारदार यांचे ओळखीचे सचिन कुलकर्णी उर्फ चिंग्या वय २४ वर्षे, पियुश नाईक […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांस चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत .

कर्जत : दिनांक २८/११/२०२१ रोजी पोह. पाटील हे नेरळ रेल्वे स्टेशन येथे ड्युटीवर असतांना त्यांना कंट्रोल रूम मधून कळविण्यात आले कि कर्जत लोकल मध्ये एक सॅक बॅग विसरलेली आहे . सदर लोकल चेक करून पाटील यांनी ती बॅग शोधून प्रवासी मनीष खाडीलकर यांना नेरळ रेल्वे पोलिस चौकीत मध्ये बोलावून ती बॅग त्याची आहे याची खात्री […]

Continue Reading

मिरा भाईंदर महानगरपालिका शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने फेरीवाल्याविरोधात केला गुन्हा दाखल.

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक २ कार्यक्षेत्रातील शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने फेरीवाल्याविरोधात दिनांक २८/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २८/११/ २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून प्रभाग समिती क्रमांक २ बॉम्बे मार्केट येथील ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना चप्पल विक्रेता अब्दुल रेहमान निजामुद्दीन हाशमी […]

Continue Reading