डोंबिवली : रेतीबंदर रोड , मोठागाव ,डोंबिवली पश्चिम याठिकाणाहून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णू नगर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती कि दिनांक ३/१/२०२२ रोजी इन्फा ऍण्ड लॉजिस्टीक्स येथील कार्यालयाजवळ, रेतीबंदर रोड, मोठागाव, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी फिर्यादी यांनी पार्क करून ठेवलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप ही अज्ञात आरोपी याने चोरी करून घेवुन गेला होता. त्यानुसार दिनांक ६/१/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करताना गाडी चोरी झाली त्या ठिकाणाची चौकशी दरम्यान पोलिसांना हि माहिती प्राप्त झाली कि चोरीस गेलेले वाहन हे ता. चाळीसगाव, जि . जळगाव या ठिकाणी बेवारस बेवारस स्थितीत मिळुन आल्याने, विष्णुनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी डम डाटाचा वापर करून, तांत्रिक पध्द्तीने, नमुद गुन्हयातील आरोपी रतन उर्फ जित् एकनाथ मासरे वय- ४३ वर्षे, राहणार- मु.पो.भउर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी लागलीच सापळा रचून आरोपीस दिनांक १०/०५/२०२२ रोजी अटक केली आहे .सदर गुन्हयाचा तपास पोहवा/ राजेंद्र पाटणकर यांनी केला आहे.
वरिल सदरची कार्यवाही ही मा.पोलीस उप आयुक्त श्री. सचिन बाबासाहेब गुंजाळ सो. परि.३, कल्याण, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.जयदीप मोरे सो. डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ एम. भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि/गणेश वडणे, पोउनि कुलदीप मोरे, पोहवा/राजेंद्र पाटणकर, पोशि/ कुंदन भामरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
