दागिने चोरी करणाऱ्या महिलेला वसई पोलीसांनी केली अटक ; ९ तोळे दागिने हस्तगत

Crime News

नालासोपारा येथे राहणारे हरीश विनायक वैती, वय.३७ वर्षे यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, दिनांक. ०१/०४/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दि. ०२/०४/२०२१ रोजी १२.०० वाजताच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटामधील स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले एकुण २,१५,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्या संमती शिवाय राहत्या  घरातुन चोरी करुन चोरुन नेले.  सदरबाबत वसई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. 1 १६५/२०२१ भा.दं.वि.स कलम ३८० अन्वये दाखल करण्यात आलेला होता

सदरचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोउपनिरी/बी.एम.पालवे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/कर्मचारी यांनी कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी नामे प्रियंका अल्पेश तरे, वय २० वर्षे, राहायला भिवंडी  हिस नायगाव परिसरातुन येथून अटक केली.आरोपी कडून गुन्हयात चोरी केलेले एकुण ९तोळे वजनाचे एकुण २,१५,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले.

सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२ वसई, श्री. प्रदिप गिरीधर, सहा.पोलीस आयुक्त, वसई विभाग,यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. कल्याणराव कर्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे सपोनि/राम सुरवसे, पोउपनिरी/भगवान पालये, आणि पथकाने  केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply