मिरारोड : दहिसर पश्चिम येथे राहणारे मयुर अरूण गायकवाड वय ३५ यांनी गोकुळ केमीस्ट मेडीकल शॉपसमोर, साईबाबा नगर, मिरारोड पुर्व याठिकाणी त्यांची मोटारसायकल उभी केली होती ती दिनांक १८/०९/२०२१ रोजी रात्री १०:०० वा. ते दिनांक १९/०९/२०२१ रोजी सकाळी ९:३० वा. त्याठिकाणावरून कोणी तरी चोरी केल्याची त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मिरारोड पोलीस ठाणे येथे जावून तक्रार केली असून त्यानुसार त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटिकरण कक्ष-१, यांनी घटनास्थळावरुन तांत्रिक पुरावे व मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सदर प्रकारचे गुन्हे करणारे संशईत इसम १) अय्युब अली बच्चा मियाँ अली वय २८, रा. मिरारोड पुर्व २) इस्माईल अस्लम साह वय २३ रा. काशिमिरा ३) अलीसा दौलत हिवाळे वय २१, रा. काशिमिरा यांना दिनांक २२/०९/२०२१ रोजी ताब्यात घेण्यात आले व त्यांची अधिक तपासणी केली असता त्यांनी मिरा-भाईंदर व मुंबई परिसरातून १० मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली . त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांच्याकडून १० मोटारसायकल, २ मोबाईल व मोटारसायकल चोरी करण्यासाठी वापरलेली कटर व इतर साहित्य असे ४,६०,४७०/-रुपये किंमतीचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. अश्या प्रकारे पोलीस तपासादरम्यान आरोपीं यांनीं मिरारोड, काशिमिरा, नवघर व एम एच बी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे एकुण ७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अविराज कुराडे, सपोनि. किशोर टोपले, पोउपनि. हितेंद्र विचारे, पुष्पराज कुराडे, सहा.पोउपनी. महादेव पाठक, राजु तांबे, पोहवा संदिप शिंदे, किशोर वाडिले, अर्जुन जाधव, संजय शिंदे, अविनाश गरजे, पोना पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रशांत विसपुते, पोशि विकास राजपुत सर्व नेमणुक गुन्हे प्रकटिकरण शाखा १ काशिमिरा यांनी पार पाडली आहे.
