मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी हरवलेल्या मुलीला केली पालकांच्या हाती स्वाधिन .

Crime News

दादर : बोरिवली ट्रेन मध्ये हरवलेली ३ वर्षांची लहान मुलगी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना सापडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. २१/०३/२०२२ रोजी अमीर जकाउल्ला खान वय 30 वर्ष, रा बेंगलोर हे आपल्या परिवारा बरोबर रेल्वे प्रवास करत असताना ते प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथे उतरले पण त्या दरम्यान त्यांची  ०३ वर्षांची लहान  मुलगी बोरिवली गाडीत चुकून राहिली. हि बातमी फोन द्वारे दादर रेल्वे स्टेशन वर दिवस पाळी ला असणाऱ्या PN/कोळेकर यांना MSF वाघ यांचा फोन आला व त्यांना बोरिवली स्लो ट्रेन मधील जनरल डबा तपासायला सांगितला .

सदर ट्रेन दादर येथे आल्यावर त्यावेळी दिवसपाळी ला असणारे ASI कोळेकर पो हवा / कदम,पो ना/ कोळेकर पो.शि/ पवार, पो शि/सोनुने यांनी ट्रेन मधील डबा तपासला असता त्यांना सदर लहान मुलगी सापडली. मुलगी सापडल्यावर MSF वाघ यांनी मुलीच्या आई वडिलांना दादर येथे ऑफिस मध्ये बोलावून ती मुलगी त्यांची असल्याची खात्री करून आलिषा अमीर खान वय 3 वर्ष हिस ठाणे अंमलदार ASI कोळेकर यांचेसमक्ष  वडिलांच्या ताब्यात देण्यात आली. आपली मुलगी सुखरूपपणे सापडल्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply