पोलीस बातमी पत्र
सद्रक्षणाय खल:निग्रहाय अशी पोलीसांची वृत्ती समजली जाते. म्हणजेच दृष्ट्यांचा नाश करण्यासाठी व अबलांचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस बांधवांची असते.किंबहुना सक्षम पोलीस बळावरच राज्य सुरक्षित राहते. आजपर्यंत राज्यावर, अखंड महाराष्ट्रावर ज्या-ज्या वेळेला नैसर्गिक, मानवी, आपत्ती आल्या त्या-त्या वेळेला पोलीसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीच्या जोरावर राज्यातील जनता भयमुक्त राहिली आहे.
शासन, प्रशासन, न्यायमंडळ आणि वर्तमानपत्र हे राज्याचे चार मुख्य स्तंभ मानले जातात. असंख्य जाणकार या चार शक्तिस्थळांवर राज्य सुरक्षित असल्याची ग्वाही देतात. परंतु आचार्य चाणक्यांच्या राजकीय विचारांकडे कुणालाही दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या राज्यांची सैनिक व्यवस्था सक्षम असते ते राज्य कधीच ढासळू शकत नाही. असे आचार्य चाणक्य नेहमीच मौर्य सम्राटांना सांगत असत. त्यामुळे राज्याची सैनिक व्यवस्था पोलीसबळ प्रबळ करणे हे राज्याचे कर्तव्य ठरते.तरी सुद्धा पोलीसांच्या अपार कार्यशक्तीचा गौरव करून त्यांचे आत्मबळ वाढविणे देखील तेवढेच गरजेचे आहे. किंबहुना स्वातंत्र्यानंतरचा ५० वर्षातदेखील पोलीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप क्वचित प्रसंगी पहायला मिळते म्हणूनच पोलिसांच्या कार्याचा अखंड गौरव करण्यासाठी ज्या- ज्या वेळेला पोलीस बांधवांकडून अभ्दुत कार्य घडले. त्या-त्या वेळेला शब्दातून त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोलीस बातमीपत्र हे वर्तमान निर्मिती करीत आहेत.
दोन वर्षापूर्वी कुणीतरी मला विचारल? ११ कोटी जनतेच्या रक्षणासाठी एक कोटी पोलीसबळ कसं काय पूर पडतं असेल? मला देखील चक्रातून सोडणारा प्रश्न होता. परंतु, माझ्या तोंडातून सहज निघून गेल.११ कोटी जनतेसाठी एक कोटी पाठबळ नक्कीच अपुरा आहे. परंतु या राज्यांमध्ये सहा कोटी जनता शांत, संयमी आणि पोलीसांना मदत करणारी आहे. त्यामुळे हे राज्य सुरक्षित आहे. राज्यातील असंख्य जनता पोलीस मित्राची भूमिका पार पाडत आहे. त्या जनतेला देखील आम्ही सलाम करीत आहोत.
एवढ्या मोठ्या राज्यांमध्ये पोलीस हे अंग बाजूला करा आणि बघा शासन कोणाला स्तंभावर उभे राहत ते, म्हणूनच जसे शासन आणि प्रशासन हातात हात घालून कार्य करते तसेच वर्तमानपत्र आणि पोलीस यांची सांगड घाला. जनतेला पोलीसांच्या कार्याची माहिती वर्तमान पत्रातून कळू द्या बघा कसं राज्य निर्धोकपणे सुरक्षित राहत ते.
रस्त्याच्या बाजूला मोटर सायकलची पावती फाडणारा ट्राफिक हवालदार दिसला की तोडपाणी होणार अशी टीका करणाऱ्यांना, ट्राफिकमध्ये अडकल्यावर तुम्हाला पोलिसांचीच आठवण येते हे विसरू देऊ नका. दिवस-रात्र, उन्हा पावसात सिग्नलवर उभे राहताना किती यातना होत असतील त्यांनाच विचार, शेवटी प्रश्न इमानाचा आणि राज्याचे रक्षण करण्याची घेतलेल्या शषथेचा असतो, असं म्हणतात माणसाच्या जिभेला हाड नसते, उन्हा- पावसात निसर्गाशी आणि माणसाशी दोन हात करताना पाठीचा कणा ताठ असावा लागतो. परंतु, एसीच्या गाडी बसणाऱ्यांना पाठीच्या ताठ कण्याची आठवण कधी होणार.परंतु हे टीका हे फक्त टीका करणाऱ्यांसाठी लागू ठरतं.
राज्यात अनेक अत्याच्याराच्या घटना घडतात, अनेक गंभीर समस्या निर्माण होतात कधी कधी सर्वसामान्यांची सुरक्षाच धोक्यात येते अशावेळी मृत्यू अंगावर घेऊन लढणार पोलीसच असतात. हे कुणीही विसरू नये. तांदळामध्ये एखाद्या खडा सापडणारच म्हणून संपूर्ण अन्नाला दोष देऊ नये. एखाद्या पोलीसाने गैरवर्तन केले म्हणून यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नसतो. म्हणूनच आम्हीपण पोलीसमित्र वर्तमानपत्र प्रकाशित करताना पोलीसांप्रती नागरिकांची आत्मीयता कधी वाढेल याचा अधिक विचार करीत असतो.
दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून गस्त घालणाऱ्या पोलीसांमुळेच राज्यातील ११ कोटी जनता शांतपणे झोपते या जनतेला पोलीसांचे कार्य समजावे म्हणून आम्ही वर्तमानपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णयाचा सर्वजण स्वागत करून आम्हाला पाठिंबा देतील ही आशा आहे.
आधुनिक काळात इंटरनेटचा मानला जातो. त्यामुळे पोलीसमित्र हे वर्तमान पत्र इ-पेपर च्या स्वरूपात सुरू करून सर्वांना संगणक, मोबाईल वर्तमानपत्र वाचता येईल असा आमचा मानस आहे.
पोलिसांशी संबंधित असणाऱ्या बातम्यांना व एखाद्या गंभीर घटनेकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी हे वर्तमानपत्र सुरू करीत आहोत. शेवटी नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या कार्यामध्ये आमचा देखील थोडा-अधिक हातभार लागेल हाच आनंद आहे. आम्ही सुरू केलेल्या वर्तमानपत्रासाठी आपल्या सदिच्छा कायम पाठीशी राहतील.