काशिगाव, काशिमीरा, मिरा-भाईंदर येथील स्वागत लेडीज बार येथे बार चालक, मॅनेजर यांच्या प्रोत्साहनाने हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बारमधील महिला वेटर ह्यांना अंग अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात. अशा मिळालेल्या बातमी वरून काशिमीरा पोलीसांनी स्वागत बारवर छापा टाकला. तिथे ०७ महिला वेटर तोडके व तंगक कपडे परिधान करून, अंग अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंगविक्षेपण करून ग्राहकांना आकर्षित करीत होते व त्यांना बार मॅनेजर स्टुअर्ट व वेटर हे प्रोत्साहन देताना मिळून आले.
मॅनेजर स्टुअर्ट व वेटर अशा ११ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १००१/२०२० कलम १८८,२९४,११४,१०९,३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संजय हजारे, काशिमिरा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड व पथक यांनी केली.
