मुंबई, अहमदाबाद हायवे रोड लगत काशिगाव येथे साई रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये अवैद्य वेश्यव्यवसाय चालू असल्याची बातमी काशिमीरा पोलीसांना मिळाली. यावरून काशिमीरा पोलीसांनी साई रेसिडेन्सी लॉजिंग व बोर्डिंग वर छापा टाकून दोन पीडित महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करून दिली. सदरची घटना दिनांक. २९/१२/२०२० रोजी रात्री घडली.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) विजय बाळकृष्ण कदम (वय-३९) राहायला. विक्रोळी, मुंबई २) विजय यादव (वय-३६) राहायला. मिरारोड (प) मुळ राहणार झारखंड ३)विजय साव (वय-३२) राहायला.ठाणे, मुळ राहणार झारखंड ४) शंभू साव (वय-३७) राहायला. दहिसर(पू) मुंबई, मुळ राहणार झारखंड यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपीविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १००२/२०२० भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७०(३),३४ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचे कामगिरी माननीय पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा रोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संजय हजारे काशिमीरा पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक. विजय पवार व पथक यांनी केली आहे.
