गुटख्याचा मोठा साठा पकडण्यामध्ये तलासरी पोलीसांचे मोठे यश

Crime News

 

तलासरी पोलीस ठाणे आरटीओ चेक पोस्ट दापचरी तालुका. डहाणू जिल्हा. पालघर येथे दिनांक. २७/१२/२०२० रोजी २:०० च्या सुमारास आरोपी नामे १) मोहम्मद रजीवा नजीर खान (वय-४०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश २) राकेश कोरी (वय-३०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश ३) गुलजार ४) फैझल ५) अशरफ यांनी त्यांच्या मालकीची आयसर टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ ओजी ३७१८ व एम. एच. ४६ बीबी ५५९२, या वाहनांमध्ये त्यांच्या मालकीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू जन्य अन्नपदार्थ त्यात विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, शुद्ध प्लस पान मसाला, शुद्ध प्लस तंबाखूचा माल वाहतूक करीत असताना तलासरी पोलीसांना मिळून आले.

आरोपींच्या ताब्यातून तब्बल १) २,४०,०००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण १० खाकी रंगाच्या गोण्या, २) १५,५५,८४०/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण ४० खाकी रंगाच्या गोण्या, ३) ४,३५,६००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण १० खाकी रंगाच्या गोण्या, ४) ३,३०,०००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंद असलेला व्ही-१ तंबाखू एकूण १० गोण्या, ५) ४८,४००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला व्ही-१ तंबाखू एकूण १० गोण्या, ६) २०,५२,०००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंद असलेला शुद्ध प्लस पानमसाला एकूण ३८ खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या, ७) ३,६०,०००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंद असलेला शुद्ध प्लस तंबाखू एकूण २० खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या, ८) १५,००,०००/- रुपये किंमतीचा आयशर टेम्पो क्र. एम.एच.४८ ओजी ३७१८ जु.वा.की.सु ९) १५,००,०००/- रुपये किंमतीचा आयसर टेम्पो क्रमांक. एम.एच. ४६ ओजी जु.वा.की.सु. असे एकूण ८०,२१,८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींच्या विरुद्धात तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक. २४३/२०२० भा.द.वि.स. कलम ३२८,१८८,२७२,२७३ सहा अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ कलम- २६(२),२७,२३,२६(२)(४),३०(२)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद रजिवान खान व राकेश कोरी यांना दिनांक. २७/१२/२०२० रोजी ५:५३ वाजता अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply