मुंबई ते पुणे असणारी HPCL कंपनीची पेट्रोलियम पाईपलाईनचे प्रेशर कमी येत असल्यामुळे HPCL कंपनीने सदर पाईप लाईन वर गस्त नेमली होती. सदर गस्ती दरम्यान दिनांक २७/९/२०२० रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास तुर्भे ओव्हर विजे येथे पाईपलाईन च्या जवळ हालचाली दिसल्याचे कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे, त्यांनी सानपाडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. यावरून सानपाडा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक गुन्हे देशमुख व इतर पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे जाऊन पोलीसांना पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र पाडून लोखंड वॉल बसून पेट्रोलियम पदार्थाची चोरी झाल्याचे दिसून आले.
त्यावरून सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर.१००/२०२० भारतीय दंड संहिता ३७९,२८५,४२७,४११,३४ सह पेट्रोलियम खनिज वाहकनळ कलम १५, सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३, सह अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियमचे कलम ३,७(१)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
दिनांक. १५/११/२०२० रोजी तांत्रिक तपासाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आणि सापळा लावून आरोपी नामे भोलाप्रसाद यादव याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्या साक्षीदाराचे नामे १)बलदेव सिंग २) जितेंद्र उर्फ जितूभाई यादव ३) केशव शेट्टी हे सानपाडा हायवे ब्रिज याठिकाणी येणार असल्याची माहिती दिल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. निकम पोलीस निरीक्षक गुन्हे. देशमुख पोलीस उपनिरीक्षक. कोळी व पथक यांनी सापळा लावून त्याच्या साक्षीदारांना शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपीला सानपाडा पोलीस आणि इथे आणून अधिक चौकशी करण्यात आली. त्यांनी सदरचा गुन्हा इतर साक्षीदाराच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.त्यावरुन, सदर चारही आरोपी यांना अटक करण्यात आले.
सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या टॅकर, मोबाईल फोन व गुन्हा करताना वापरलेले साहित्य असा एकूण ३,२०,०००/-मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील चोरी केलेले डिझेल हे आरोपीने चिखली बुलढाणा येथे बायो डिझेल पंपाचे मॅनेजर सुरेश भास्कर सपकाळ यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे, त्यांना बुलढाणा येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री. बिपिन कुमार सिंग, माननीय सह पोलीस आयुक्त श्री. जय जाधव, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ श्री. सुरेश मेंगडे आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. भरत गाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक. राहुल कोळी नेम सानपाडा पोलीस ठाणे हे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास करीत आहेत.
