कोरोना काळात लॉकडाऊन शितील झाल्यामुळे नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस चोरीचा प्रकार वाढत आहे. चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त. बिपिन कुमार सिंह, माननीय सहपोलीस आयुक्त. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उप आयुक्त. सुरेश मेंगडे परिमंडळ-१ वाशी व सह पोलीस आयुक्त. भरत गाडे.तुर्भे विभाग यांच्या आदेशाने माननीय वरिष्ठ पोलिस निरीक्षक. रवींद्र पाटील एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत गस्त करण्याचे आदेश दिले होते.
एन.आर.आय सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक.३०९/२०२० भादविस कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे दिनांक. २०/११/२०२० रोजी चोरी गुन्ह्यातील फिर्यादीन त्याच्या घरातील दुरुस्तीसाठी ठेवलेले जुने ३४ मोबाईल हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरफोडी करून चोरी केले असावे, अशी तक्रार दाखल केली.
सदर गुन्ह्याचा तपास एन.आर. आय व नेरूळ पोलीस ठाणे करत असताना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधाराने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय मनवर नामक (वय२०) याला २१/११/२०२० रोजी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील गेलेल्या संपूर्ण मुद्देमाल म्हणजे ३४ जुने वापरते मोबाईल जप्त करण्यात आले.
सदर आरोपी अक्षय पवार याचे यापूर्वी एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
