मनुष्य वध करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पालघर ने केले जेरबंद

Crime News

दिनांक. ५/११/२०२० रोजी श्री.चुनीलाल रावताजी रावल (वय५३) व्यवसाय-व्यापार राहायला गंगादेवी नगर, बलसाड गुजरात राज्य यांनी तलासरी पोलीस ठाण्यात खबर दिली की, त्यांचे राजत इंटरप्राईजेस नावाचे तेल, तूप व साखर होलसेल रिटेल विकण्याचे दुकान उमरगाव येथे असून त्या दुकानाची उधारी व मालाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांचा मुलगा निलेश उर्फ दिनेश चुनीलाल रावल (वय२९) हा नेहमीप्रमाणे बुधवारी दिनांक. ४/११/२०२० रोजी दुपारी०२:३० वा.चे सुमारात तलासरी बाजूकडे गेला होता. तो रात्री पुन्हा परत न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. मौजे झरी गावाचे हद्दीत तलासरी ते उमरगाव रोडच्या बाजूला त्यांची मोटरसायकल उभी असलेली मिळून आले. त्यावरून तलासरी पोलीस ठाणे मनुष्य बेपत्ता रजिस्टर नंबर १७/२०२० दिनांक.५/११/२०२० दाखल करण्यात आली.

बेपत्याचा तपास दिनांक.८/११/२०२० रोजी निलेश उर्फ दिनेश चनीलाल रावल यांचा मृतदेह मौजे कुर्झे तालुका तलासरी गावाच्या हद्दीत धरणाच्या पाण्यात मिळून आला त्याचे मृतदेहास गोणीत दगड भरून बांधून ठेवले होते. सदर मृतदेह साक्षीदार मुकेशकुमार कैलासजी रावल (वय२५) (दिनेश चुन्नीलाल रावल चा मामेभाऊ) त्याने ओळखून हा दिनेश असल्याचे सांगितले आणि त्याला कोणीतरी पळून घेऊन जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकून दिल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाणे गु.र.नं २३०/२०२० भादविसक ३०२,२०१,३६४,३४ हा गुन्हा दिनांक. ८/११/२०२० रोजी दाखल करण्यात आली.

सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो. पालघर,माननीय अपर पोलीस अधीक्षक सो. पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील व स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोलीस पथक व पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सायबर सेल व पथकांच्या मदतीने आरोपीचा तपास केला.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी ह्याला सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला आणि दिनेश रावल एकमेकांना ओळख असल्याचे सिद्ध झाले. आरोपी यांनी सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी दिनेश रावल त्याच्याकडून खर्चासाठी पैशाची मागणी केली होती. परंतु, दिनेशने नकार दिला. त्यावरून दिनेश हा दर बुधवारी दुकानाच्या उगराणीसाठी तलासरी बाजूकडे जात असताना त्याच्याकडे किमान एक ते दीड लाख रुपये होते. असा आरोपीने अंदाज करून कट रचून दिनेश रावल वर पाळत ठेवून मित्राची ओमनी कार ही कामासाठी मागून घेऊन दिनेश चा पाठलाघ केला. दिनेशला रस्त्यात एकटे गाठून व थांबून त्याच्याकडे पुन्हा खर्चासाठी पैशाची मागणी केली. तेव्हा देखील पुन्हा दिनेश रावल ने नकार दिल्यामुळे त्याला लाकडी दांड्याने मारून जबरदस्तीने कारमध्ये बसून त्याच्याकडून सुमारे १२,०००/-रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा गळा दाबून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह दगडाने भरलेल्या गोणीत बांधून, गोणीसहा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकून दिला.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply