बनावट चाव्या बनवून वाहनांची चोरी करणारी टोळी गजाआड

Crime News

बनावट चावीचा वापर करून होंडा डियो, ॲक्टीव्हा मोटर स्कूटर व रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला दा.नै. नगर पोलीस ठाणे येथील गुन्हे व वर्सोवा पोलीस ठाणे मुंबई ने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ०५मोटर सायकल व ०१ऑटो रिक्षा तसेच वर्सोवा पोलीस ठाणे येथील मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यातील ०१ मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहे.
याप्रकरणी १)जुबेर अब्दुल रहमान शेख उर्फ जुब्बा (वय२५) २)अय्याज हारून सय्यद( वय२५) ३)आकाश पवार (वय१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबई उपनगरांमध्ये मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून आल्यामुळे दा.नै. नगर पोलीस ठाणे मुंबई हद्दीत चोरीला गेल्या मोटर वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. दिनांक. १८/११/२०२० रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना यांच्या विश्वासू बातमीदाराकडून मोटरसायकल चोरी करणारे आरोपी हे नवरंग सिनेमा समोर जे.पी.रोड अंधेरी (पश्चिम) मुंबई या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पहिल्या दोन आरोपींना अटक करण्यात आले. तसेच पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हिलमा हॉस्पिटल समोर, नाल्याच्या बाजूच्या झोपडपट्टी, चिकूवाडी, लिंक रोड बोरिवली (पश्चिम) मुंबई या ठिकाणी सापळा रचून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी माननीय श्री. संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबई व श्री. अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-९ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती. ज्योत्स्ना शासन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गमणे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल मुळे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि पथक यांनी अथक प्रयत्न करून पार पाडले.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply