सदरची घटना 304- रेहान टेरेस एस व्ही रोड, जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू सोसायटी मध्ये घडली लग्न जमवणारे दलाल श्रीमती. सावैरा यांच्या ओळखीने शाहरुख शफी खान या व्यक्ती बरोबर दिनांक. 19/07/2019 रोजी मुस्लिम रीतिरिवाज प्रमाणे लग्न झाले.
लग्न होताच काही महिन्याने पतीने पैश्याचा तगादा लावला असता .समरीन शाहरुख खान ने आपल्या वडिलांकडून 8,50,000/- रुपये मुलीच्या सुखासाठी स्वतःचे घर विकून दिले. परंतु, समरीनच्या घरातील नणंद साजिया खान,दीर नईम खान सासरे शफी खान व सासू वहिदा खान यांनी समरीनला मार पिट करणे अर्वाच्या शिव्या देणे उपाशी ठेवणे असे प्रकार करीत होते. गरोदर राहिल्यावर ही तिला गर्भपात कर असे सांगून पोटावर लाथा बुक्के मारत होते. या वेळी तिचे सासरे शफी खान यांनी अनेकवेळा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदरची बातमी समरीन शाहरुख खानने आपल्या घरी कळवली असता तिचे सर्व दागिने काढून घराबाहेर हाकलून दिले.
काही दिवसाने समरीन शाहरुख खानचा पती तिच्या घरी गेला व दयेची याचना करू लागला व आपण पुन्हा सुखाने संसार करू मला माझ्या आई वडिलांनी घराबाहेर काढले आहे. अशी बतावणी करू लागला समरीनच्या वडिलांनी त्या दोघांना एक भाडोत्री घर घेऊन दिले फर्निचर भांडी टीव्ही अश्या अनेक वस्तू आपल्या मुलीच्या सुखासाठी घेऊन दिले. काही दिवस होत नाही तोच आरोपी शाहरुख खान घरातील उर्वरित दागिने घेऊन पसार झाला.
बरेच दिवस पतीचा सुगावा लागत नाही. असे, पाहताच समरीन शाहरुख खानने मालवणी पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली. समरीनच्या जबानी वरून तिच्या सासऱ्याचे वसई येथे प्लास्टिक रेनकोट मनुफॅक्चरिंग व विक्री करणारे एमपायर रेन वेअर नामक कंपनी आहे. पैश्याने व्यवसायिक असलेल्या श्रीमंत घराण्याने अश्या पद्धतीने नवविवाहित एक बाळाला जन्म दिलेल्या मातेला असे वाऱ्यावर सोडून तिची संपत्ती व श्रीधन लुटणे कितपत योग्य आहे.
आमच्या पोलीस बातमी प्रतिनिधींशी बातचीत करताना असह्य होऊन तिने न्यायालयात धाव घेतली आहे व मला न्याय नाही मिळाला तर मी व माझे बाळ याच्या सकट आत्महत्या करिन असे सांगितले कारण माझ्या लग्नासाठी माझ्या आई वडिलांनी सर्व विकून स्वतःही भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत. माझ्या पतीचे घरी खूप श्रीमंती आहे. त्यांचा समोर माझा निभाव लागेल का असा प्रश्न निर्माण होतो.
