अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरात घुसून त्याच घराची चोरी करणारा आरोपी नामे. सागर ढोणे (वय ३२) राहायला- गोवंडी, मुंबई याला तब्बल ३ तासात रबाळे पोलीस ठाणे यांनी अटक केली. आरोपी सागर ढोणे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्यामुळे त्याच्या विरोधात याआधी मानखुर्द गोवंडी, देवनार इत्यादी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत.
दिनांक. ३०/१०/२०२० रोजी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तक्रार केली की, सागर ढोणे नामक व्यक्ती याने घेतलेले पैसे न देता फिर्यादीच्या घरात घुसून पिस्तुलचा धाक दाखवून कपाटातील २०,०००/- रुपये रोख रक्कम मोबाईल आणि संगणक जबरदस्तीने घेऊन गेला आणि फिर्यादीला जाताना जर पोलीसात तक्रार केली तर जीवे मारेन अशी धमकी दिली.त्यामुळे याबाबत रबाळे पोलीस ठाणे गु.र.नंबर ३१७/२० भा.द.वि. ३९२, ४५१, ३४ सह शस्त्र कायदा ३,२५ प्रमाणे नोंद करण्यात आली.
त्याच दिवशी दुसऱ्या फिर्यादीला सागर ढोणे यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचे कारण काढून फिर्यादी यांना पिस्तुलचा धाक दाखवून जिवंत मारण्याची धमकी देऊन इतर साथीदारांच्या मदतीने इको कार मध्ये फिर्यादीला जबरदस्ती बसून मुंब्रा येथे घेऊन गेला आणि पिस्तुल व चाकू दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुंब्रा येथे जेव्हा गाडी थांबली तेव्हा फिर्यादी ने सागर धुणे आणि त्याच्या साथीदारांची नजर चुकवून तिथून पळ काढला आणि त्याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे आरोपीविरुद्ध दुसऱ्यांदा रबाळे पोलीस ठाणे गु.र.नं.३१६/२०२० भा.द.वि कलम ३६५, ५०६(२), ३४ सह शस्त्र कायदा ३,४,२५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घडलेले दोन्ही गुन्हे हे गांभीर्य स्वरूपाचे असल्याचे लक्षात घेऊन रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने माहिती काढून सागर ढोणेला शिवाजी नगर गोवंडी,मुंबई येथून ताब्यात घेऊन केलेल्या गुन्ह्यात अटक केली. आरोपी सागर ढोणे कडून १ देशी कट्टा, १ चाकू, १ कम्प्युटर सीपीयू, १ एलसीडी मॉनिटर आणि १ मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री.बिपिन कुमार सिंह, माननीय पोलिस आयुक्त. डॉ. विजय जाधव, माननीय पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) श्री. सुरेश मेंगडे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी विभाग श्री. विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.योगेश गावडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक.अंकुश चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक.अमित शेलार यांनी पार पाडली
