दिनांक-१४/१०/२०२० रोजी ०४.३० वाजता तलासरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद हायवे रोडच्या मुंबई वाहीणीवर ता.तलासरी, जि.पालघर येथे आरोपी विजय रणजित धोडी, वय-२५ वर्षे, रा.मलाव पारशीपाडा, ता.उबंरगाव जि.वलसाड राज्य-गुजरात याने त्याने ताब्यातील कार नं. एम. एच. ०३ ए. एम. ५६३६ ही चालवुन घेवुन येत असतांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता कार न थांबवता मुंबई बाडुकडे भरधाव वेगात घेवुन पळुन गेला. सदर कारचा पाठलाग करुन त्यास पकडुन वाहनाची तपासणी केली असता त्याचे ताब्यातील वाहनात विनापरवाना महाराष्ट्रात बंदी असलेल्या प्रोव्हिविशन गुन्हाचा माल वाहतुक करीत असतांना मिळुण आला. सदर आरोपी यांचे ताब्यातुन १)४७,४५०/- इंपरियल ब्ल्यु कंपनिच्या १८० मीलीच्या एकुण ७३० काचेच्या सिलबंद बाटल्या एका बाटलीची किंमत ६५ रुपये त्यावर इंग्रजित सेल फॉर ओन्ली दादरा नगर हवेली असे लिहलेले. २)२,००,०००/-रुपये किंमतीचा एक सफेद रंगाची मारुती एस.एक्स.४ कार नं. एम.एच.०३ ए.एम.५६३६ असा एकुण २,४७,४५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचे आरोपी यांचेविरुद्ध तलासरी पोलीस ठाणे गुन्हा गु.र.जि. क्र.२२३/२०२० महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) (इ), सह. मो. वा. का. कलम १८४,१३०/१७७,१३२/१७७ प्रमाणे, दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
