दिनांक २६/०९/२०२० रोजी विरार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खानिवडे तसेच खार्डी ता.वसई येथील तानसा/वैतरणा नदीच्या पात्रात काही इसम विनापरवाना रेती उत्खनन करत असल्याची गुप्त माहीती श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मिळाली होती, मिळालेल्या माहीतीच्या आधारे ७,९०,००,३५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र. ा ८३२ व ा ८३३/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी तपासीक अधिकारी यांना आरोपी यांचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विरार पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. ा ८३३/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचे तपासिक अधिकारी श्री.विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेवुन सदर गुन्हयातील आरोपी १) भावेश बळीराम जाधव वय ३१ वर्ष २) नितीन जयराम तरे वय ४२ वर्ष ३) कल्पेश अनंत पाटील वय ३२ वर्ष ४) मनोज अनिल घरत वय ३७ वर्ष सर्व रा. खानिवडे नॅशनल हायवे ०८, विरार पुर्व ता.वसई जि. पालघर यांना दिनांक २८/०९/२०२० रोजी २०.१२ वाजता अटक केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
