दि.२९/०९/२०२० रोजी २२.३० वाजताचे सुमारास मौजे नावझे गावाचे नाक्यावर आरोपी क्र. १) प्रतिश रविंद्र राडऐ, वय १९ वर्षे, रा.ठाकुरपाडा, सफाळे, ता.जि.पालघर २) सागर उर्फ डॉन यशवंत पाटील, वय २२ वर्षे, रा.जलसार, पो.टेंभीखोडावे, ता.जि.पालघर हे होंडा शाईन मोटार सायकल नंबर एम.एच.०४/डीयू-७८८३ हिचेतून पेट्रोल चोरी करीत असतांना सुज्ञ नागरीकांनी आरोपींना पकडून सफाळा पोलीसांना पाचारण केल्याने सदर आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेवून तक्रारदार श्री.जितेंद्र रमेश भोईर, वय २८ वर्षे, रा.नावझे, भोईरपाडा, ता.जि.पालघर यांचे फिर्यादी वरुन सफाळा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ा७२/२०२० भादंविस कलम ३७९,३४ अन्वये दि. २९/०९/२०२० रोजी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आलेली होती.
सदर गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करुन अटक आरोपींनी यापुर्वी सफाळा पोलीस ठाणे गुर नं. ा ४७/२०२० भादंविस कलम ३७९ हा गुन्हा उघडकीस आणण्यास तसेच कल्याण तालुका पोस्टे (जि.ठाणे ग्रामीण) गुर नं. ा २७०/२०२० भादंविस कलम ३७९ हा गुन्हा उघडकीस आणण्यास यश प्राप्त झालेले असून नमूद गुन्हयातील १००ज्ञ् माल हस्तगत करण्यात आलेला असून याचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी क्र.२ सागर उर्फ डॉन यशवंत पाटील याचेविरुद्ध यापुर्वी केळवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. १) ा ०८/२०१५ भादंविस कलम ३२४,५०४,५०६,३४ २) ा ११/२०१५ भादंविस कलम ३९४,३४ ३) ा ०७/२०२० भादंविस कलम ३९५,४१२ आर्म अॅक्ट (३) २५, (क) अन्वये एकूण ०३ गुन्हे दाखल असून केळवा सागरी पोलीस ठाण्यात सदर आरोपीचे हिस्ट्रीशिट अभिलेख तयार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई श्री.विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि/सुनिल जाधव, पो.हवा/महेंद्र शर्मा, पो.हवा/ए.एन.बोरसे, पोना/विशाल विसावे, पोना/संदिप नागरे, पोना/वैभव सातपुते, पोकॉ/शिवपाल प्रधाने, पोकॉ/मोकल यांनी केलेली आहे.
