दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी फडणीस, महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. संजय राजेश शेकोकार तसेच महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री. शहाजी जगन्नाथ माने या सर्व मान्यवरांमार्फत आपल्या आश्रय ट्रस्टचे संस्थापक आणि पोलीस बातमी पत्राचे संपादक श्री दिपक मोरेश्वर नाईक साहेब यांनी ग्लोबल पेंडेमिक डिसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या covid-19 या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावा समयी लॉकडाऊन मध्ये असलेल्या गरीब तसेच गरजू लोकांना औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याबद्दल पोलीस जाणीव सेवा संघाच्या वतीने त्यांस कोविड योद्धा हे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
