वालीव पोलीस ठाणे अ.मृ.२०९/२०२० सीआरपीसी १७४ मधील मयत नामे सोमनाथ उर्फ कुमु राजन कुठियॉ, वय २६ वर्षे, व्यवसाय-मजुरी रा.ठि. ए-२०२ गुरुकृपा सोसायटी, फादरवाडीा, गोखीवरे, वसई पुर्व ता.वसई जि.पालघर यांचे मरणाबाबत डॉक्टरांनी पोटावर स्टॅपिंग होऊन अंतर्गत रक्तश्रावामुळे मयत झाल्याचा अभिप्राय दिल्याने खुनाचा गुन्हा वालीव पाोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७६०/२०२० भा.द.वि.सं. कलम ३०२ अन्वये दिनांक २२.०९.२०२० रोजी २१.४९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपीच्या शोध घेऊन त्यास लवकरात लवकर अटक करणेबाबत श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधिक्षक पालघर यांनी सुचना निर्गमीत केल्या त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक श्री विलास चौगुले यांनी गुन्हे प्रकटिकरण अधिकारी व कर्मचारी यांना मयताचे मरणाबाबत व आरोपीबाबत शोध घेण्यास कळविल्यानंतर सदर पथकाने मयत हा काम करत असणा-या कंपनीत जाऊन सदर गुन्हयासंदर्भात तपास केला असता तपासात ‘‘गुप्त बातमीदारामार्फत’’ तसेच आजुबाजुच्या लोकांमार्फत माहीती मिळाली की, सदर कंपनीत काम करणारा मयत नामे सोमनाथ उर्फ कुमु राजन कुठियॉ, वय २६ वर्षे व आरोपी नामे जयंत ऊर्फ जय प्रसन्न राऊतराय हे एकत्र काम करत असतांना त्यांचे आपसात दारु पिऊन झालेल्या भांडणात मनात राग धरुन जिवेठार मारले असावे अशी माहीती मिळताच सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन वालीव पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयाचा कौशल्य पुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी नामे जयंत ऊर्फ जय प्रसन्न राऊतराय, वय ३७ वर्षे, हा फादरवाडी, डोंगरी परीसरात एका परीसरात लपुन बसल्याचा माहीती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केले असता त्याने सदर गुन्हा केला असल्याचे सांगितले असता आरोपी यास दिनांक २३.०९.२०२० रोजी १८.४९ वाजता अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, जि.पालघर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री.विजयकांत सागर, अपर पोलीस अधीक्षक, वसई, श्रीमती. अश्विनी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, वसई उपविभाग यांचे सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास चौगुले, प्रभारी अधिकारी वालीव पोलीस ठाणे त्याचप्रमाणे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश फडतरे, पो.ह./ रवि पवार, मनोज मोरे, मुकेश पवार, पो.ना./राजेंद्र फड, अनिल सोनवणे, पो.शि./बालाजी गायकवाड, सचिन बळीद, स्वप्नील तोत्रे यांनी केली आहे.
