दिनांक २४/०९/२०२० रोजी सायंकाळी १९.१५ वाजेच्या सुमारास आशागड चरी नाका येथे एका पञ्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी १) विजय पांडु िंनबला वय ३२ वर्षे, धंदा मंजुरी, २) कृष्णा सुरेश दुमाडा वय २१ वर्षे, धंदा-शेती, ३) लखमा रुपजी सुतार वय ४५ वर्षे, रा.आशागड निंबलपाडा ता.डहाणु, जि.पालघर, ४) टिकु रजेश गुप्ता व इतर २ ते ३ इसम यांनी स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता कल्याण मटका जुगार खेळण्याची साधने स्वत:च्या कब्जात बाळगुन कल्याण मटका खेळ पैसे लावुन खेळत असताना मिळुन आले. सदरच्या गुन्हयातील आरोपी यांचेकडुन १) २८०/- रुपये रोख रक्कम व लावा कंपनीचा ५००/-रुपये किंमतीचा मोबाईल २) १९०/रुपये रोख रक्कम, ५,०००/-रुपये किंमतीचा एम.आय कंपनीचा अँन्ड्रोईड मोबाईल ३) ३३०/- रुपये रोख रक्कम ४) कल्याण मटका जुगाराची साधन त्यामध्ये मिळुन आलेल्या डायरीमध्ये एकुण-६८० रुपये ५) ४०,०००/-रुपये बजाज कंपनीची ब्लु रंगाची प्लसर मोटरसायकल नं.एम.एच.४८ ए.डी. ४१८७ ६) २०,०००/- रुपये हिरो कंपनीची स्पेडर प्लस काळया रंगाची मोटरसायकल नं. एम.एच.४८ ए.एल. २७९२ ७) ४५,०००/-रुपये टिव्हीएस कंपनीची अपाची काळया रंगाची मोटरसायकल असा एकुण १,११,४८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी यांचे विरुद्ध डहाणु पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ाा १६९/२०२० मुंबई जुगार अॅक्ट १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक/जी.बी.ओमासे, प्रभारी अधिकारी डहाणु पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली डहाणु पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
