दिनांक १४/०९/२०२० रोजी १८.१० वाजताचे सुमारास नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर जवळ टेकडीवर आंब्याच्या झाडालगत मोकळया जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे १) आनंत गजानन सावंत वय ४५ वर्षे रा.रुम नं.००२ सन्नी अपार्टमेंट नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व ता.वसई जि.पालघर व त्यांचे साोबतचे पळून गेलेले इतर तीन ते चार इसम नावे पते माहीत नाही तीन पानी नावाचा जुगार ५२ पत्ते मांडून त्यावर पैसे लावून खेळत अगर खेळवीत असतांना मिळून आले. आरोपी याचे ताब्यातुन ८००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन आरोपी यांचे विरुध्द तुळींज पोलीस ठाणे गु.र.नं.ाा ८००/२०२० मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास दिनांक १४/०९/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.डी.एस.पाटील, प्रभारी अधिकारी, तुळींज पोलीस ठाणे, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
