दि. ०२/०९/२०२० रोजी सायंकाळी १९.०० वाजताचे सुमारास तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील नालासोपारा पुर्व अचोळे रोडवरील भरत शॉपींग सेंटरचे पहील्या माळयावरील शॉप नं. ०५ व ०६ या गाळयामध्ये व सनशाईन सर्कल येथील घन्सार प्लाझा शॉप नं १ किंग्ज कॅफे येथे हुक्का पार्लर चालु असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी क्र. १) किसन धमेंद्र सिंग वय-२१ वर्षे, व आरोपी क्र. २) राम अकबाल यादव, वय-२४ वर्ष, यांनी स्व:ताचे आर्थिक फायदयाच्या दृष्टीकोनातुन बेकायदेशीर रित्या हुक्का पार्लर साहीत्यासह हुक्का पार्लर चालवीत असतांना तसेच कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर हुक्का ओढतांना तोच रबरी पाईप गि-हाईकांना कोरोना रोगाचा संसर्ग पसरु शकतो हे माहीत असतांनाही त्यांचा जिव धोक्यात टाकुन सदरचे हुक्का पेटवण्यासाठी बंदीस्त रुममध्ये कोणत्याही प्रकाराची आग विझवण्याची साधने उपलब्ध न करता लोकांचा जिव धोक्यात येईल असे हयगईचे वर्तन केले आहे. तसेच आरोपी क्र. १ यांच्या ताब्यातुन १३,७००/-रु. किंमतीचे व आरोपी क्र.२ यांचे ताब्यातुन ८,४००/- रु. किंमतीचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी यांचेविरुद्ध तुळींज पोलीस ठाणे भा.दं.वि.सं. कलम १८८,२७०,२८५ सह सिगरेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणीज्य व्यवहार उत्पादन पुरवाठा व वितरण याचे विनियमन) अधिनियम २००३ चा सुधारीत अधिनियम २०१८ कलम ४ व २१ प्रमाणे, दोन गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक/श्री. डी. एस. पाटिल, प्रभारी अधिकारी तुळींज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
