एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन रुग्णांची नोंद झाली.
नवी दिल्ली, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख पार झाली आहे. एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन रुग्णांची नोंद झाली. याआधी 29 ऑगस्ट रोजी 78 हजार 479 रुग्ण सापडले होते. तर, आज 1043 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या एकूण रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या 8 लाख 15 हजार 538 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 67 हजार 376 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 29 लाख 70 हजार 493 रुग्ण निरोगी झाले आहे.
अमेरिका-ब्राझील या देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 40 हजार 899 तर, ब्राझीलमध्ये 48 हजार 632 रुग्ण सापडले.
7 दिवसात 1.11% वाढली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
एका आठवड्यात नवीन रुग्णांच्या संख्येबरोबरच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण रोज 1.5% च्या सरासरीनं वाढत आहेत. 76 हजार 431 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
मृत्यूदरात झाला घट
दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर आणि अॅक्टिव्ह केस रेटमध्ये घट झाला आहे. मृत्यूदर 1.75% झाला आहे. तर, अॅक्टिव्ह रेट 21% झाला आहे. यासह रिकव्हरी रेट 77% आहे.
