धक्कादायक! कंस्ट्रक्शन साइटवर 37 मजुरांना कोरोना; पालिकेने कामच केले बंद

Crime News

ठाणे : तीन हात नाका परिसरात सुरु असलेल्या एका कंस्ट्रक्शन साइटवर काम करत असलेले ३७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या अँटीजन टेस्टमध्ये हे मजूर पॉझिटिव्ह निघाले असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने भाईंदर पाडा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे . दरम्यान, ही कंस्ट्रक्शन साइट बंद करण्यात आली असून पालिकेच्या शहर विकास विभागाला देखील पत्र देण्यात आले आहे अशी माहिती नौपाडा -कोपरी विभागाच्या सहाय्यक प्रणाली घोंगे यांनी दिली आहे. इतर मजुरांच्या देखील टेस्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . तीन हात नाका परिसरात एका बिल्डर्सच्या माध्यमातून कंस्ट्रक्शनचे मोठे काम सुरु असून या कंस्ट्रक्शन साइटवर मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर काम करत आहेत. शनिवारी या कंस्ट्रक्शन साइटवर एक ते दोन मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रविवारी अँटीजन टेस्टसाठी कॅम्प लावण्यात आल्यानंतर या कॅम्पमध्ये ८२ पेक्षा अधिक मजुरांनी टेस्ट केली असून यामध्ये ३७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर उर्वरित मजुरांची टेस्ट ही निगेटिव्ह निघाली आहे. जे मजूर पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून जे निगेटिव्ह निघाले आहेत त्यांची देखील नियमित टेस्ट केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सांगितले . जे निगेटिव्ह निघाले आहेत त्यांना देखील भाईंदर पाडा येथे ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले असून साईट बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीत अँटीजन चाचणीला सुरुवात करण्यात आली असून जवळपास १ लाख अँटीजन किट्सच्या माध्यमातून ९ प्रभाग समितीमध्ये ही चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे ९ प्रभाग समितीमध्ये अनेक ठिकाणी या चाचणीसाठी सेंटर्स निर्माण करण्यात आले असून नागरीकांना या सेंटर्सच्या माध्यमातून मोफत कोरोनाची मोफत चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाका कामगार, घरकाम करणाऱ्या महिला यांची यांची देखील अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या सर्व नाका कामगार आणि घरकाम करणाऱ्यांच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply