दिनांक १३/०८/२०२० रोजी सायकाळी १८.०० वाजता ते दिनांक १८/०८/२०२० रोजी सकाळी १०.०० चे सुमारास सफाळा पश्चिम येथे असलेल्या शॉप नं. ३ येथे फिर्यादी रोशन नरहरी भोईर यांचे साई इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकानाचे पाठीमागील खिडकी व ग्रील चे कडया उचकटुन आत मध्ये करुन १०,०००/- किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एम ०१ मॉडेलचा मोबाईल, २,५००/- रुपये किंमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचे ०२ नविन मोबाईल तसेच १,५००/- किंमतीचे ०३ ब्लुटुथ एअरफोन असा एकुण १४,०००/- रुपये किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता. त्याबाबत सफाळा पोलीस ठाणे गुरनं ६२/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा तांत्रिक तसेच कौशल्यपुर्ण तपासाअंती उघडकीस आणण्यास सफाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यश प्राप्त झालेले आहे. सदर गुन्हयात आरोपी १) नाजु सौशिंगभाई फ्लास वय २२ वर्षे सध्या रा.विराथन बुद्रुक ता.जि. पालघर मुळ रा.खजुरिया ता.गरवारा जि. दाहोद (राज्य-गुजरात) २) अजय भलीयाभाई मावी वय १९ वर्षे सध्या रा. विराथन बुद्रुक ता.जि.पालघर मुळ रा.निलीआंबा ता.धानपुर जि. दाहोद (राज्य-गुजरात) ३) किसन लन्नु परमार वय १९ वर्षे सध्या रा. विराथन बुद्रुक ता.जि.पालघर मुळ रा. नेरसुर ता.गरवारा जि. दाहोद (राज्य-गुजरात) यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांनी चौकशी दरम्यान त्यांनी सफाळा पोलीस ठाणे हद्दीत एकुण तीन ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचे त्याब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला खालीलप्रमाणे माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर श्री. विकास नाईक यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि/सुनिल जाधव, पो.उप निरी. पंकज पाटील, पो.हवा/९२ महेंद्र शर्मा, पो.ना./१५५८ संदीप नागरे, पो.कॉ/१६७३ अमर गायकवाड, पो.कॉ./७९० शिवपाल प्रधाने यांनी केलेली आहे.
