दिनांक २५/०८/२०२० रोजी १८:३० वाजता कासा पोलीस ठाणे हद्दीतील चारोटी-घोळ टोलनाका येथे मुंबई वाहीनीचे तिसरे लेनवर, आरोपी क्र. १) शाहनवाज इंम्तीयाज खान, वय २६ वर्ष, २) सुरेंद्रकुमार लोटनप्रसाद गुप्ता, वय २३ वर्ष, ३) मोहम्मद युसुफ सगिर शेख, वय २४ वर्ष, यांनी आपसात संगणमत करुन रेनॉल्ड कंपनीची सिल्व्हर रंगाची लॉडजी कार नं. एम.एच.४८ ए.डब्ल्यु.०३५४ तंबाखुजन्य पदार्थाचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व तो विक्री करता व वाहतुक करण्यास प्रतिबंध केलेला आहे हे त्यांना माहीत असतांनाही त्यानी शासकीय आदेशाची अवहेलना करुन तो माल वापी गुजरात येथुन भरुन अवैध्य रित्या विक्री करीता वाहतुक करीत असतांना मिळुन आले. आरोपी त्यांचे ताब्यातुन १) ७४,०५२/- रु. किं चे विमल पान मसाला जांभळया रंगाचे ३७४ पॅकेट, २) ८,२२८/- रु. किं चे वि – १ तंम्बाखु लाल रंगाचे ३७४ पॅकेट, ३) ३,००,०००/- रु. किं. ची रेनॉल्ड कंपनीची सिल्व्हर रंगाची लॉडजी कार नं. एम.एच.४८ ए.डब्ल्यु.०३५४ असा एकुण ३,८२,२८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी याचे विरुद्ध कासा पोलीस ठाणे गु.र.नं. ा १५२/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. सदर गुन्हयातील आरोपी यांना दिनांक २५/०८/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती सिध्दवा जायभाये, प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
