सावधान! व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढलं; सायबर पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

Cyber Crime

मुंबई – राज्यात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. यात, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून ब्लॅकमेल करण्याचा नवा धंदा हॅकर्सनी सुरू केल्याचे सायबर सेलने म्हटले आहे.व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे, की “अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यांत हॅकर पीडित युझरचे आक्षेपार्ह फोटो तो सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये टाकतो. यानंतर ते पीडित व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट्सच्या सहाय्याने त्यांचे अकाउंट हॅक करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात.महाराष्ट्र सायबरने युझर्सना केले अलर्ट -व्हॉट्सअ‍ॅप युझर आपला मोबाईल बदलतात, तेव्हा त्यांचा नवा मोबाईल हा त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेला आहे. याची त्यांनी खात्री करायला हवी. हे व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोडद्वारे करता येते. हॅकरला युझर्सचा मोबाईल क्रमांक माहिती असतो. यामुळे, जर युझरने आपला व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड कुणाशी शेअर केला, तर हॅकरला त्याच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळतो. यानंतर संबंधित युझरचे अकाउंट हॅक होते आणि हॅकरला युझरच्या सर्व संपर्कांचा आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अॅक्सेस मिळतो. यानंतर गुन्ह्यांना सुरुवात होते. एखाद्या युझरचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानतंर हॅकर्स त्याच्या संपर्क क्रमांकांतील सर्वाधिक संपर्क असलेला एखादा क्रमांक हेरतात आणि संबंधित युझरला त्या सर्वाधिक संपर्क होणाऱ्या क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे सांगतात. यामुळे पीडित युझर व्हेरिफिकेशन कोड आपल्या सर्वाधिक संपर्क असलेल्या क्रमांकावर पाठवतो आणि हॅकर त्याचे अकाउंट हॅक करतो.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply