दिनांक १८/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळे चाफानगर येथे एक इसम हा त्यांच्या राहत्या घरात मटका बिटींगचे नावावर लोकांकडुन पैसे स्विकारुन मटका जुगार खेळवित असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी सफाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता आरोपी क्र. १) अशोक बालु वाघेला २) दिपक अशोक वाघेला दोन्ही रा.चाफानगर, सफाळा ता.जि.पालघर, हे त्यांच्या राहत्या घरात मटका बिटींगचे नावावर लोकांकडुन पैसे स्विकारुन मटका जुगार खेळत व खेळवित असतांना मिळून आले. आरोपी यांचे ताब्यातुन ३४,८४०/- रुपये तसेच मटका जुगाराचे साधन मिळुन आले. आरोपी यांचे विरुध्द सफाळा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ाा ६३/२०२० महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे. सदर गुन्हयातील दोन्ही आरोपी यास दि.१८/०८/२० रोजी अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही सहायक पोलीस निरीक्षक श्री.सुनिल जाधव, सफाळा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी./पाटील, पो.हवा/९२ शर्मा, पो.ना./१३२८ मोरे पो.कॉ/१६७३ गायकवाड यांनी केलेली आहे.
