२४ तासांत ११२ पोलिसांना करोनाची लागण

Regional News

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यातील ११२ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या १२ हजार ४९५वर गेली आहे.

राज्यात आतापर्यंत १२ हजार ४९५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १० हजार १११ पोलीस करोनामुक्त झाले असून २ हजार २५६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या २४ तासांत आणखी दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे दगावलेल्या पोलिसांची संख्या १२८ झाली आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत चालल्याने पोलीस खाते आणि आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, काल राज्यात दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाख २८ हजार ५१९वर पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.०९ टक्के इतका आहे. राज्यात काल ८ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील रुग्णसंख्या ६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. तर, आजपर्यंत ३२ लाख ०६ हजार २४८ चाचण्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काल दिवसभरात २२८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २० हजार २६५ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ३७ हजार ५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply