आज रोजी बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसी बोईसर प्लॉट क्रमांक टी -141 नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल हे प्रोडक्ट चे काम चालू असताना मटेरियल मध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशन चालू असताना सायंकाळी 19:30 वा रियाक्टर चा प्रेशर वाढून स्फोट झाला असले बाबत कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने सांगितले असून त्यामध्ये 1) मोहम्मद मोहसीन अल्ताफ वय 30 वर्ष 2) दिलीप गुप्ता वय 28 वर्ष 3) उमेश कुशवाहा वय 22 वर्ष 4) प्रमोदकुमार मिश्रा वय 35 वर्ष हे चार इसम जखमी झालेले असून 01 मयत आहे त्याचे नाव संदीप कुशवाहा असे आहे सर्वांना तुंगा हॉस्पिटल बोईसर या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मा.अपर पोलीस अधीक्षक, पालघर, मा. SDPO बोईसर मा. तहसीलदार सुनिल शिंदे पालघर एमपीसीबी चे अधिकारी मनीष होळकर midc फायर ब्रिगेड असे हजर आहेत.
