विरार पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घाण्याकरिता श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे सुचनेप्रमाणे श्री. विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग व श्रीमती. रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेवून अशा प्रकारचे गुन्हे करणाया गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. सुरेश वराडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी श्री.संदेश राणे, पोलीस उपनिरीक्षक यांना सदरच्या चोरीच्या घटनांना पायबंद बसविण्याकरिता त्यांची सत्वर उकल करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री.संदेश राणे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणताही तांत्रिक पुरावा नसतांना कौशल्यपुर्ण तपास करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवुन आरोपी विक्रांत शंकर कदम वय २३ वर्षे रा.बटरपाडा, पेल्हार फाटा, ता.वसई जि.पालघर यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन विरार पोलीस ठाणे येथे खालील दाखल गुन्हे उघडकीस आणुन त्याचे कडुन एकुण ३६,७००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश वराडे, प्रभारी अधिकारी, विरार पोलीस ठाणे यांचे मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.संदेश राणे, सफौ/राजेश वाघ, पो.हवा/सचिन लोंखडे, पोना/सचिन घेरे, पोना/विजय दुबळा, पोना/हर्षद चव्हाण, पोना/भुषण वाघमारे, पोशि/इंद्रनिल पाटील, पोशि/विशाल लोहार, पोशि/सुमित जाधव, पोशि/रवि वानखेडे, पोशि/सुनिल पोटील नागरे यांनी केली आहे.
