दिनांक १३/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे करवाळे गावाचे हद्दीत मुख्य रस्त्याचे बाजूस असलेल्या विहीरीजवळ दुमजली असलेल्या गाळयाचे वरील नवीन बांधकामाचे इमारतीतील बंद खोलीमध्ये, सफाळे पुर्व, ता.जि.पालघर येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळल्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी १) सुरज भानुदास वैद्य, वय २७ वर्षे, २) राजेश नथुराम किडरा, वय ३० वर्षे, ३) अमर संतोष शेलार, वय २० वर्षे, ४) प्रशांत मधुकर शिंदे, वय २२ वर्षे, ५) प्रकाश अनंत पवार, वय ४० वर्षे, ६) सचिन दत्ताराम रहाटवल, वय ३२ वर्षे, ७) संदीप पांडुरंग शेलार, वय ३२ वर्षे सर्व रा.सरतोडी, सफाळे पुर्व हे तिन पत्ती नावाचा जुगार खेळतांना मिळुन आले आरोपी यांचे ताब्यातुन ५१,८४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी यांचे विरुध्द सफाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ाा ८०/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५, १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ ते ७ यांना दिनांक १३/०८/२०२० रोजी अटक करुन जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही सहा. पोलीस निरीक्षक श्री.सुनिल जाधव, सफाळा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सफाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
