भाईंदर- सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे मीरारोड येथील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंती लगत उभ्या केलेल्या १५ दुचाकीचे नुकसान झाले आहे. मीरा रोडच्या बेव्हरली पार्क भागात न्यायालयाच्या इमारतीला लागूनच असलेल्या अॅशले कॉ.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीची संरक्षक भिंत लोखंडी गेटसह बुधवारी सकाळी कोसळली, संरक्षक भिंतीच्या आत सोसायटीची पार्विंâगची जागा आहे. तेथे दुचाकी उभ्या केल्या जातात. दुर्घटना घडली तेव्हा १५ दुचाकी उभ्या होत्या, त्यावरच भिंत कोसळल्यामुळे सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने ढिगार्याखाली अडकलेल्या दुचाकी
बाहेर काढल्या
