केळवा- दि. ७-८-२०२० रोजी धावंगेपाडा मिठागर केळवा ता. जि. पालघर येथे आरोपी नरेंद्र लाखन, दिपेश दत्त भुरकुड, विष्णु बारक्या हजारे, बाबू चंद्रया पाटील, संदेश मधुकर पाटील, दिपक चिंतामणी किणी सर्व राहणार धावंगेपाडा केळवा ता. जि. पालघर यांनी धावंगेपाडा मिठागर केळवा येथे जवळील जुने बांधकाम असलेल्या पडक्या शेडमध्ये तीन पत्ती
नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना त्यांच्याकडे एकूण २३३०रु किंमतीच्या जुगार खेळण्याचे साहित्य, रोख रकमेसह मिळून आले. व मा जिल्हाधिकारी पालघर यांची मनाई आदेशाचे उल्लंघन करून जुगार खेळताना मिळून आले. म्हणून आरोपी यांच्याविरुद्ध केळवा पोलिस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३७/२०२० भादविका कलम २६९, १८८सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ५१ (ब) सह साथीचे रोग कायदा कलम ३ सह. महा जुगार प्रति १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
