पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ३२ वर्षीय इसम राहायला वापी, राज्य गुजरात हा सफेद रंगाची पिक अप झिप हिच्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला ३,४६,०००/- गुटखा विमल पान मसाला, व्हि-१ हा माल विक्रीसाठी वापी गुजरात येथुन भिवंडी येथे घेवून जात असताना वाडा पोलीस ठाणे यांना मिळून आले.
सदर आरोपीच्या ताब्यातून १) ९६,०००/- रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याचे एकूण ४ प्लास्टिक गोणी प्रत्येक गोणी मध्ये ४ पुडे व प्रत्येक पुड्यात ५० पॅकेट प्रत्येक पॅकेटची किंमत १२०
२) २,५०,०००/- रुपये एक सफेद रंगाची पिक अप झिप हिचेवर टाळ्या रंगाची प्लॅस्टिक बांधलेली असा एकूण ३,४६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यावरून आरोप विरुद्ध वाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २८/२०२१ भा.द.वि.स.क. २७२, २७३, १८८, ३२८ सह अन्नसुरक्षा कायदा कलम २००६ चे कलम २६(२),(१),४,३०(१) (ए) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री सुधीर संखे, प्रभारी अधिकारी वाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
