Credit Card Reward Point द्वारे फसवणूक रक्कम रु.७,३५,०००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यांना यश.अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील भाईंदर परिसरातील श्री. मनिष रा. भाईंदर, मिरारोड यांची अनोळखी मोबाईल धारकाने त्यांच्या क्रेडिट कार्डाच्या खात्यात Reward Point जमा करायचे सांगुन क्रेडिट कार्डाची माहिती घेवुन ७,३५,००० /- रु ची फसवणुक केली याबबत त्यांनी दिनांक २८/११/२०२३ रोजी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली होती.
नमूद तक्रारीबाबत सायबर कक्षाने तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत अवलोकन केले असता तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम Razorpay या पेमेंट वॉलेटवर झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तात्काळ Razorpay या पेमेन्ट गेटवे कंपनीचे नोडल अधिकारी यांचेशी तात्काळ फोनद्वारे संपर्क साधुन व ईमेलद्वारे पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांच्या फसवणुकीच्या रक्कमेचे ट्रान्झेक्शन तात्काळ थांबविण्यात आली. तसेच त्यानंतर पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली रक्कम ७,३५,०००/- त्यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे.
सायबर पोलीस ठाणे यांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Credit Card Reward Point संदर्भात येणा-या कॉल्स, एसएमएस ला प्रतिसाद देवू नये. • Credit Card संबंधीत माहिती कोणासही उघड करु नये.
- Credit Card Reward Point संदर्भात कोणतीही लिंक अगर अॅप मोबाईलवर प्राप्त झाल्यास ओपन करु नये.
- आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईन 1930 तसेच आपले संबंध बँकेशी संपर्क साधावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि /स्वप्नील वाव्हळ, पोउनि / प्रसाद शेनोळकर, पोअं / १२०९५ गणेश इलग, पल्लवी निकम, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, मसुब/राजेश भरकडे, सोनाली मोरे यांनी पार पाडली आहे.
सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक :- १९३०
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट:- www.cybercrime.gov.in
