भाईंदर : आजच्या दैनदीन जिवनामध्ये नागरिक एकमेकांसोबत संवाद साधण्याकरीता व्हॉट्सअॅपचा वापर मोठया प्रमाणावर करीत आहेत. हिच गोष्ट लक्षात घेवून सायबर गुन्हेगार वेगवेगळया क्लुप्त्यांचा वापर करुन व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांच्या फसवणूक करण्याकरीता करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने व सध्या सुरु असणारा प्रकार +84, +62, +60, +92 अशा नंबरने सुरवात असलेल्या आंतराष्ट्रीय नंबरवरून (मलेशिया, केन्या, व्हिएतनाम, इथिओपिया) कॉल करून फसवणूक करीत आहेत. अशा प्रकारांमध्ये कॉल उचलल्यास काही ना काही कारण करून लिंक, फोटोझ, व्हिडीओ क्लिक करून रेटींग अथवा काही पैसे मिळतील असे आमिष दाखविले जाते. परंतू अशा लिंक, फोटोझ, व्हिडीओच्या मागे माल्वेअर (व्हायरस) असल्यास आपल्या मोबाईलमधील डेटा शेअर होवून आपली फसवणूक होवू शकते.
तरी सायबर गुन्हे कक्ष, मि. भा.व.वि. यांच्याकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,
१. अ ८४, अ ६२, अ ६०, अ ९२ अशा क्रमांकाने सुरुवात असलेल्या व्हॉट्सअॅप नंबरचे कॉल/व्हिडीओ कॉल रिसीव्ह करू नये अथवा चॅटींग करू नये.
२. आपल्या व्हॉट्सॲपवर Two Step Veification सेटींग Enable करून ठेवा.
३. अनोळखी व्हॉट्सअॅप वरून आलेल्या लिंक, फोटोझ, व्हिडीओजवर क्लिक करू नका.
४. आपल्या व्हॉट्सअॅप चा सिक्युरीटी कोडची मागणी केल्यास तो कोणासही देवू नका.
५. बँकेच्या कार्ड तपशील, पिन, ओटीपी पासवर्ड इत्यादी वैयक्तीक किंवा आर्थिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.
६. कोणतीही बँक, सिम मोबाईल कंपनी, गॅस वितरण एजन्सी, इलेक्ट्रीसिटी व्हॉट्सॲपवर ग्राहकांची माहिती मागत नाहीत.
तरी मिरा-भाईंदर,वसई-विरार शहरातील नागरिकांना सायबर गुन्हे कक्ष, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे जाहिर आवाहन करण्यात येत की, अशा प्रकारे होणा-या फसवणूकीबाबत सतर्क रहावे. तसेच अशा प्रकारे कोणत्याही इसमाची फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
