दिनांक २०/०९/२०२१ मिरा-भाईंदर परिसरात रिक्षा व बाईक यांची चोरी करणाऱ्या आरोपींची धरपकड करण्याची मोहीम पोलीस ठाणे तील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि.महेंद्र भामरे व त्यांचे स्टाफ यांनी चालू केली होती त्यावेळी नमुद मोहिमे दरम्यान पोलीस अमंलदार संतोष तायडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशईत शोएब अस्लम खान नावाचा वाहन चोर अमर पॅलेस सिग्नलजवळ सरोजा हॉटेल समोर रिक्षा मध्ये बसला आहे. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सपोनि. महेंद्र भामरे, सपोनि. प्रशांत गांगुर्डे, पोउपनि. जावेद मुल्ला व त्यांच्या पथकाने सापळा रचून शोएब अस्लम खान, वय-२४ वर्षे, काशिमीरा, मिरारोड (पु), ता. जि-ठाणे यास ताब्यात घेऊन त्याची पोलीस ठाण्यामध्ये कसून चौकशी करून त्याने केलेले ३ गुन्हे उघडकीस आणले . सदर आरोपी कडून ५०,०००/- रुपये किमतीची चोरीस गेलेली १ रिक्षा, ७५०००/- रुपये किमतीची चोरीस गेलेली लाल रंगाची बजाज कंपनीची पल्सर २२० दुचाकी व २२०००/- रुपये किमतीची चोरीस गेलेली लाल रंगाची पॅशन प्रो दुचाकी असा एकूण १,४७,०००/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री अमित काळे, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ-०१ व श्री विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.निरी.श्री संजय हजारे, पोनि.श्री विजय पवार (गुन्हे), पोनि.श्री जितेंद्र पाटील (प्रशासन), स.पो.निरी.महेंद्र भामरे, स.पो.निरी.श्री प्रशांत गांगुर्डे, पो.उप.नि.जावेद मुल्ला, पो.ना. सुरेश शिंदे, पोशि. संतोष तायडे, पोशि. स्वप्निल मोहिले, पोशि. शरद नलावडे, पोशि. जयकुमार राठोड, पोशि. सुधीर खोत व पोशि. सचिन मोरे सर्व नेमणुक काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.
