सिंधुदुर्ग :- तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग , सांगवे गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग बॅाबं शोध नाशक पथकातील असिस्टंट सब इन्सपेक्टर संजय पुंडलिक साटम यांना भारत सरकार तर्फे राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
२६-११ चा मुंबई दहशतवादी हल्ला , सिंधुदूर्गातील नागरतास बॅाबं ब्लास्ट घटना , विष्णुदास भावे स्फोटक घटना अशा अनेक प्रकरणात संजय साटम यांनी स्फोटके निकामी करण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.
पोलिस महासंचालक पदक तसेच ४२८ रिवॅार्ड सहीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून अनेक प्रमाणपत्रे संजय साटम यांना बहाल करण्यात आली आहेत.तसेच समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोकांनी महाराष्ट्र पोलिस दलातील अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या शूर, लढवय्या पोलिस अधिकाऱ्याचे मनःपुर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
