घरफोडीचा गुन्हा उघड; १५ लाखांहून अधिक किंमतीचे ८३ मोबाईल जप्त.📱🚔

Crime News Cyber Crime Fashion Latest News Political News Regional News ताज्या घडामोडी

वसई – घरफोडीच्या गुन्हयाची उकल करुन १५ लाखापेक्षा जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी. अधिक माहितीनुसार विरार पोलीस ठाणे  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील फिर्यादी श्री ऋषीकेश चेलाराम गुप्ता वय २४ वर्ष राहणार सुरेश ऍटो  पेट्रोलपंपाच्या बाजूला, विरार फाटा, कन्हेर, विरार पूर्व, ता वसई, यांच्या शॉप नं ०७, प्रभाकर अपार्टमेंट, सिटी बार अँड रेस्टॉरंट समोर, चंदनसार रोड, विरार पूर्व या मोबाईल शॉप दुकानाचे दिनांक १६/०२/२०२६ रोजी रात्री ०८.०० वाजता ते दिनांक १७/०२/२०२६ रोजी सकाळी ०८.३० वाजताचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटरच्या लॉकची कडी कशाने तरी तोडून दुकानात प्रवेश करुन २१,८६,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल घरफोडी करुन चोरुन नेले होते.

नमुदची घरफोडी ही मोबाईल दुकानात झाली असल्याने अशा प्रकारचे मोबाईल दुकानात घरफोडी करण्याची गुन्हे पार्श्वभूमी असलेल्या  रेकॉर्डवरील आरोपी पप्पु ऊर्फ अजमतअली मोहम्मदअली शेख याचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सफौज / मनोज मोरे यांचे बातमीदाराकरवी नमुदचा गुन्हा हा नमुद आरोपीनेच केला असल्याचे तपासात निष्पन्न करुन गुन्हयाची उकल करण्यात आली.गुन्हयात निष्पन्न आरोपी पप्पु ऊर्फ अजमतअली मोहम्मदअली शेख, रा. धानिवबाग, नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर मुळ रा. भरोठीया, हेथमाली, डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश , नमुद गुन्हयाची उकल केल्यानंतर आरोपीने गुन्हयात चोरलेले मोबाईल हे त्याने ट्रॅव्हल्स मधून कुरीअर व्दारे त्याचे मुळ गावी जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश येथे पाठवित असल्याचे माहीती प्राप्त करुन सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी १५,४७,६१६/- रुपये किंमतीचे एकुण ८३ मोबाईल फोन जप्त करुन हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा २ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनिरी/ सोपान पाटील, पोउपनिरी / संतोष घाडगे, सहाफौज / संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा / प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, प्रशांत ठाकुर व राहूल कर्पे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.