मिरारोड (दि.७) : Unauthorised Credit Card Transaction (Paysafe Financial Servises, London) मधील फसवणूक झालेली ८४,५६३/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले अधिक माहितीनुसार
नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रीमती हिना यांचे क्रेडीट कार्डवरुन ८४,५६३/- रुपये रक्कम काढून घेण्यात आल्याबाबत दिनांक १९/०५/२०२३ रोजी तक्रार सायबर गुन्हे कक्षास प्राप्त झालेली होती.त्यावरून नमूद तक्रारीबाबत दखल घेवून तक्रारदार यांच्या व्यवहाराबाबत सायबर कक्षाने माहिती प्राप्त केली. त्यानंतर तक्रारदार यांची फसवणूक रक्कम Unauthorised Credit Card Transaction – Overseas Transaction झाल्याचे दिसून आले. सदरची रक्कम Paysafe Financial Servises, London – Skrill3130 LONDON GB वर पुर्ण झाल्याची तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन तक्रारदार यांची फसवणूक ८४,५६३/- रुपयांची फसवणूक रक्कम थांबविण्यात आली. तसेच सदरची फसवणूक रक्कम पुन्हा तक्रारदार यांच्या मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Unknown Link, Email वर क्लिक करू नये.
- आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयहक्तिक माहिती उघड करू नये.
- कोणत्याही अनोळखी कॉल आल्यास त्याची विश्वासर्हता पडताळणी करुन घ्यावी.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पो. नि. श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि. स्वप्नील वाव्हळ, पो.उप.नि. प्रसाद शेनोळकर, स.फौ. संतोष चव्हाण, म.पो. हवा. माधुरी धिंडे, पो. अंम. गणेश इलग, प्रविण आव्हाड, पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, कुणाल सावळे यांनी केली आहे.
सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५
सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक
९०० ४८८ ०९३५
सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
