पालघर – घरफोडी चोरीचा गुन्हा ४८ तासाचे आत उघड करून भारत-नेपाळ सीमेवरून मुख्य आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.अधिक माहितीनुसार फिर्यादी श्री. पियुष दिनेश जैन, वय २५ वर्षे, राहणार-पालघर यांनी तक्रार दिली की, त्यांनी त्यांचे नाकोडा ज्वेलर्स, अशोका शॉप नं. ६ अंबर शॉपिंग कॉम्पलेक्स पालघर (प) हे दुकान दि. ०८/११/२०२५ रोजी रात्रौ ०८.३० वाजता बंद केलेले होते. त्यांना दि. ०९/११/२०२५ रोजी सकाळी ०८.४० वा. समजले की, त्यांचे नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या लगत जान्हवी फॅशन या दुकानाचे शटर तुटलेले दिसत आहे. म्हणुन फिर्यादी यांनी त्यांचे नाकोडा ज्वेलर्स दुकान उघडुन पाहीले असता, त्यांचे व जान्हवी फॅशन या दुकानाची सामाईक भिंतीस होल पाडुन त्यांचे ज्वेलर्स शॉप मध्ये प्रवेश करुन, दुकानातील लोखंडी तिजोरी गॅस कटरने कापुन, त्यातील ५ किलो ४२० ग्रॅम वजनाचे सोने व सोन्याचे दागिने, ४० किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि २०,००,०००/-रुपये रोख रक्कम असा एकूण ३,७२,३५,४६०/- रुपयांचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे.
सदर प्रकरणी दुकानाचे बाहेरील सि.सि.टी.व्ही. पाहिले असता त्यामध्ये अशोका अंबर शॉपिंग मॉलचा वॉचमन १) दिपक सिंग, २) नरेश यांनी त्यांचे इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने सदर बाबत पालघर पोलीस ठाणे येथे दि.०९/११/२०२५ रोजी गुन्हा करण्यात आला . सदर गुन्हयाचा तपास सपोनि/मल्हार थोरात, नेमणूक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
मा. पोलीस अधीक्षक साो, पालघर श्री. यतीश देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक पालघर श्री. विनायक नरळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ मॅडम यांनी नमुद गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेटी देवुन गुन्हयाचे गांर्भीयानुसार गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखा पालघर व पालघर पोलीसांना योग्य त्या सुचना देवुन त्यांची वेगवेगळी पथके तयार केली. सदर गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे १) ११२८.७८ ग्रॅम वजनाचे सोने, २) ३८.७०१ किलो वजनाची चांदी, ३) १,७५,७३०/- रु. रोख रक्कम असा ऐवज मिळुन आला. त्यातील सोने व चांदी फिर्यादी यांना लागलीच परत केलेली आहे.
यातील आरोपींचा तांत्रीक दृष्टीने अधिक तपास करुन, आरोपींचे फोटो निष्पन्न केले असता आरोपी हे नेपाळचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गुजरात बाजुकडुन नेपाळकडे पलायन केल्याचे दिसून आल्याने, त्यानुसार नेपाळ बॉर्डरची माहिती घेवुन तात्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर कडील पोलीसांनी आरोपींचा माग काढून सुरत गुजरात राज्य येथे आरोपींचा तांत्रीक दृष्टया तपास केला. तसेच खेरी-उत्तरप्रदेश राज्य येथील नेपाळ बॉर्डरवर जावुन तेथील सुरक्षा कर्मचारी यांचे मदतीने ०४ आरोपी १) दिपक नरबहादुर सिंग, वय २५ वर्षे, धंदा-वॉचमन, गांव-वार्ड क्र. ०२ गांव गेरुआ, ता. गुटु, जि. सुरखेत, नेपाळ२) भुवनसिंग जवानसिंग चेलाऊने, वय ३७ वर्षे, गांव-वार्ड क्र. ५ गांव मेहताल, ता. गुटु, जि. सुरखेत, नेपाळ३) जिवनकुमार रामबहादुर थारु, वय ४३ वर्षे, गांव-वार्ड क्र. ०७ कैरयसा, पोलीस ठाणे सुखड, नेपाळ४) खेमराज कुलपती देवकोटा, वय ३९ वर्षे, धंदा-वॉचमन, रा. वार्ड क्र. ०४ गांव-मलकाबाजार, लमकी चुहा नगरपालीका, जि. कैलाली, पोलीस ठाणे मोतीपुर, नेपाळ.यांना ताब्यात घेतले नमुद आरोपीचे अंगझडतीत १) ६१६.९ ग्रॅम वजनाचे सोने, २) ७८०.८ ग्रॅम वजनाची चांदी, ३)१८,९२०/- रु. रोख रक्कम असा ऐवज मिळून आलेला आहे. तसेच सदर गुन्हयात अधिक तांत्रीक तपास करुन, सुरत-गुजरात येथुन खालील अजून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलेला आहे.५) अर्जुन दामबहादुर सोनी, वय ४४ वर्षे, सद्या रा. सुरत गुजरात, मुळ गांव वार्ड क्र. ०२ गांव गोहनिया, जि. कैलाली नेपाळ
नमुद आरोपीकडून १) ५१० ग्रॅम वजनाचे सोने, २) २ किलो चांदी, ३) ३,००,०००/- रु. रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा हा दि.०८/११/२०२५ ते दि. ०९/११/२०२५ रोजी रात्री च्या दरम्यान घडलेला असुन, अत्यंत जलदगतीने तांत्रीक तपास करुन, खेरी उत्तरप्रदेश राज्य येथील नेपाळ बॉर्डरवरुन दि. ११/११/२०२५ रोजी एकुण ०४ आरोपी व सुरत-गुजरात येथुन ०१ आरोपी असे एकुण ०५ आरोपी अटक करण्यात आलेले असुन, गुन्हयात चोरीस गेलेले मालमत्तेपैकी २२५५.६८ ग्रॅम सोने, ४१ किलो ४८१ ग्रॅम चांदी, ४,९४,६५०/- रु. रोख रक्कम असा एकुण ३,२८,१८,४५०/- रुपयांचा (तिन करोड अट्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास) ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग श्रीमती प्रभा राऊळ यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोनि/अंनत पराड, सपोनि/अनिल व्हटकर, सपोनि/मल्हार थोरात, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोउनि/धनाजी काळे, पोउनि/विठ्ठल मणिकेरी, श्रे.पोउनि/सुनिल नलावडे, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/कपिल नेमाडे, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/चंद्रकांत सुरुम, पोना/कल्याण केंगार, पोअमं/प्रशांत निकम, पोअमं/विशाल लोहार, पोअमं/विशाल कडव पोअमं/सागर राऊत, पोअमं/वाल्मीक पाटील, म.पोअमं/स्नेहल शेलार, म.पोअमं/स्नेहलता ढोले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पालघर पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अमंलदार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.


