मिरारोड – Online Hotel Book करताना फसवणुक झालेली १,४०,५७६/- रूपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश.अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे तक्रारदार श्री. मंदाविया हे ऑनलाईन हॉटेल बुकींगकरीता गुगल सर्च करीत होते. सर्च करीत असताना त्यांनी एका मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यावेळी त्यांचा सदर क्रमांकाशी संपर्क झाला नाही. काही वेळानंतर तक्रारदार यांचे मोबाईलवर अनोळखी इसमाने कॉल करुन ऑनलाईन हॉटेल बुकींग करीता माहिती विचारुन बुकींग कन्फर्म करण्याकरीता मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी लिंकवर क्लिक करताच काही वेळात त्यांचे बँक खात्यातुन रक्कम कपात याबाबत मॅसेज प्राप्त झाला. त्यावर तक्रारदार यांना त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने सायबर पोलीस ठाणे येथे ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारी अर्ज सादर केल्याने सदरबाबत तात्काळ नोंद घेवुन ऑनलाईन NCCRP Portal देखील नोंद घेण्यात आली.
तक्रारदार यांची ऑनलाईन NCCRP Portal वर तक्रार नोंदविल्याने फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये थांबविण्यात आली. तसेच फसवणुकीच्या व्यवहाराचे अनुषंगाने अधिक तपास करुन तक्रारदार यांची रक्कम वर्ग झालेल्या ०६ बँक खात्यांची माहिती प्राप्त करुन रक्कम थांबविण्याबाबत कारवाई करण्यात आली.
सदरची ०२ वेगवेगळ्या बँक खात्यांमधील रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्याबाबत तक्रारदार यांना सुचना देण्यात आल्या. तक्रारदार यांनी त्यांची फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयात याचिका सादर केलेली, त्याबाबत सायबर पोलीस ठाणे यांनी मा. न्यायालयामध्ये सविस्तर अहवाल सादर केला व मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त केले.
अश्याप्रकारे सायबर पोलीस ठाणे मा. न्यायलय व बँकेकडे पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली रक्कम १,४०,५७६/- रूपये त्यांचे मुळ खात्यात परत मिळविण्यात आलेली आहे.
तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्यात आलेनंतर रक्कम परत केल्याबाबत त्यांना प्रतिकात्मक चेक देवून माहिती देण्यात आलेली आहे. फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
मोबाईलवर प्राप्त लिंक अथवा APK File डाऊनलोड करु नये. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता असते.
ऑनलाईन गुगल सर्च करीत असताना कोणत्याही साईटची पडताळणी केल्याशिवाय कारवाई करु नये.
अनोळखी मोबाईलधारकाबाचत खात्री झाल्याशिवाय आपली कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करु नये.
मोबाईल प्राप्त संदेश, अनोळखी लिंक, माहितीची पडताळणी केल्याशिवाय कारवाई करु नये.
Whatsapp, Telegram, Instagram या सारख्या सोशल मिडीयावरील प्राप्त जाहिरातीची पडताळणी केल्याशिवाय कारवाई करु नये.
कोणतेही अनाधिकृत अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नये
ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930/1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (प्रकटीकरण), यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, प्रकाश सावंत यांचेसह सपोनि /स्वप्नील वाव्हळ, पोउनि/धनवडे, सफौ/संतोष चव्हाण, मपोहवा/माधुरी धिंडे, मपोहवा/अमिना पठाण, मपोअं/सुर्वणा माळी, पोअं/ कुणाल सावळे, पोअं/शुभम कांबळे, मपोअं/स्नेहल पुणे, पोअं/ विलास खाटीक, पोअं/ सावन शेवाळे, पोअं/राहुन बन, मसुब/ राजेश भरकडे, मसुब/प्रविण सावंत, मसुब/मंगेश बोरसे, मसुब/बोरकर सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक १९३०/१९४५
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट : www.cybercrime.gov.in


